वासिम जाफर कोचच्या भूमिकेत, बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी करार!

मुंबई : रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम रचणारा भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज वासिम जाफर (wasim jaffer) आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने वासिम जाफरसोबत करार केला आहे. बांगलादेशातील हाय परफॉर्मन्स अकॅडमी या क्लबचा कोच म्हणून जाफरची नियुक्ती केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर वर्षातील सहा महिने बांगलादेशातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करेल. बांगलादेश क्रिकेट […]

वासिम जाफर कोचच्या भूमिकेत, बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी करार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

मुंबई : रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम रचणारा भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज वासिम जाफर (wasim jaffer) आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने वासिम जाफरसोबत करार केला आहे. बांगलादेशातील हाय परफॉर्मन्स अकॅडमी या क्लबचा कोच म्हणून जाफरची नियुक्ती केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर वर्षातील सहा महिने बांगलादेशातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करेल. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने याबाबतचा प्रस्ताव जाफरला पाठवला होता, तो त्याने स्वीकारला.

नुकतंच वासिम जाफर ढाका प्रीमियर लीग (DPL) मध्ये आबहानी लिमिटेड या संघाकडून खेळला होता. त्याची फलंदाजी पाहून प्रभावित झालेल्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्याची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यासाठी उत्सुकता दाखवली होती. जाफरच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेश क्रिकेट संघातील सौम्या सरकारने जबरदस्त कामगिरी केली होती.  ढाका प्रीमियर लीगमध्ये सौम्या सरकारने एक शतक आणि एक द्विशतक ठोकलं होतं.

दरम्यान, बांगलादेशातील हाय परफॉर्मन्स अकॅडमीच्या प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव जाफरने स्वीकारल्याची माहिती बीसीबीच्या अधिकाऱ्याने दिली. मे 2019 ते एप्रिल 2020 दरम्यान जाफर कोचिंग करेल. अंडर 16 आणि अंडर 19 क्रिकेटपटूंना जाफर मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर जाफरची नियुक्ती बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या फलंदाज सल्लागारपदी केली जाऊ शकते.

41 वर्षीय वासिम जाफर हा भारताचा अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाफरने धावांचा रतीब घातला आहे. जाफर भारताकडून 31 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 1944 धावा केल्या आहेत. शिवाय दोन वन डे सामन्यातही जाफर भारताकडून खेळला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.