वॉनने टीम इंडियाच्या विजयाचं कनेक्शन पुन्हा ‘मुंबई इंडियन्स’शी जोडलं, वसीम जाफरचं जबराट उत्तर!
सतत भारतीय संघावर कमेंट करणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने पुन्हा एकदा भारतीय संघाला डिवचणारं ट्विट केलं आहे.
मुंबई : शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंडचा (india Vs England 4th T20) 8 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. अगदी मोक्याच्या क्षणी दुखापतीमुळे विराटला (Virat kohli) ग्राऊंड सोडावं लागलं. परंतु रोहितच्या शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने गेलेली मॅच पुन्हा आणली. अशावेळी सतत भारतीय संघावर कमेंट करणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने (michael vaughans) पुन्हा एकदा भारतीय संघाला डिवचणारं ट्विट केलं आहे. तर त्याच्या ट्विटला दुसऱ्यांदा भारतीय संघाचा माजी फलंदाज वसीम जाफरने (Wasim Jaffer) खास अंदाजात प्रत्युत्तर दिलं आहे. (Wasim Jaffer once Again reply michael vaughans After India Defeat England 4th T20)
मायकल वॉनने काय म्हटलंय ट्विटमध्ये?
मायकल वॉनने भारतीय संघाच्या विजयाचं वर्णन करताना टीम इंडियाची खिल्ली उडवली आहे. वॉनने टीम इंडियाच्या विजयाचं कनेक्शन मुंबई इंडियन्सशी जोडलं आहे. “विराटची कमाल कॅप्टन्सी… त्याने अखेरच्या काही ओव्हर्ससाठी रोहितकडे कर्णधारपदाचा भार दिला, आणि रोहितच्या तंत्राने बाकी काम केलं”, असं ट्विट त्याने केलंय.
Great captaincy from Virat … !! Allowing @ImRo45 to get involved & clearly his tactics work … #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 18, 2021
मायकल वॉनचं दुसरं ट्विट
एकच ट्विट करुन मायकल वॉन थांबला नाही. त्याने विजयाचं भारतीय संघाचं विजयाचं कनेक्शन सांगणारं दुसरं ट्विट केलं. त्यात तो म्हणाला, “फक्त सांगतोय, सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स), हार्दिक पांड्या (मुंबई इंडियन्स), रोहित शर्मा इंडियन्स….
Just a thought … @surya_14kumar Mumbai Indian … @hardikpandya7 Mumbai Indian … @ImRo45 captaincy Mumbai Indian !!!! @mipaltan #JustSaying #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 18, 2021
वसीम जाफरचं प्रत्युत्तर
मायकल वॉनने पुन्हा एकदा भारतीय संघाची खिल्ली उडवल्यानंतर वसीम जाफरनेही त्याला चांगलंच सुनावलं. त्यानेही खास अंदाजात ट्विट करत तसंच ट्विटमध्ये त्याचं कुठेही नाव न घेता त्याला चांगलंच प्रत्युत्तर दिलं.
“जर आपण म्हणत असाल की आपल्या टीमला एका नॅशनल टीमने नाही तर एका फ्रँचायजी टीमने हरवलं तर आपण प्रतिस्पर्धी टीमची नाही तर आपल्याच संघाची खिल्ली उडवत आहात, आपल्याच संघाला ट्रोल करता आहात”, असं ट्विट करत वसीमने वॉनला उत्तर दिलं.
याअगोदरही वॉन-जाफरमध्येही जुगलबंदी
भारतीय संघाचा पहिल्या टी ट्वेन्टीत इंग्लंडने 8 विकेट्ने दणदणीत पराभव केला (Ind Vs Eng T20). साहेबांनी दमदार विजय मिळवल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारतीय संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ भारी असल्याचं म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या टीकेला भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय. (Wasim Jaffer Reply England Ex Captain Michel Vaughan over Mumbai Indians Better than team india Statement)
काय म्हणाला होता मायकल वॉन?
भारतीय संघावर नेहमी टीकाटिप्पणी करणाऱ्या वॉनने पहिल्या टी ट्वेन्टीतल्या पराभवानंतरही भारतीय संघाला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याने भारतीय संघाची तुलना मुंबई इंडियन्सची केली. तसंच भारतीय संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ भारी असल्याचं ट्विट त्याने केलं.
Not all teams are lucky enough to play four overseas players Michael? #INDvENG https://t.co/sTmGJLrNFt
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 12, 2021
वसीम जाफरने काय उत्तर दिलं होतं?
“सगळे संघ इतके भाग्यशाली नसतात की आपल्या संघात 4 विदेशी खेळाडूंना ते खेळवू शकतील”, असा जोराचा चिमटा काढत जाफरने शालजोडीतून वॉनला प्रत्युत्तर दिलं. एकंदरित जाफरचा बाण इंग्लंडच्या संघात असलेल्या परदेशी खेळाडूंकडे होता. त्याचं हेच एका ओळीचं प्रत्युत्तर नेटकऱ्यांना तुफान आवडलंय. त्याच्या या ट्विटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
(Wasim Jaffer once Again reply michael vaughans After India Defeat England 4th T20)
हे ही वाचा :
6 बोल 23 रन्स, शार्दूलच्या हाती बोल, 2 वाईड, भारताची धडधड आणि रोहित शर्माची एन्ट्री, नेमकं काय घडलं?
4 ओव्हरसाठी कॅप्टन्सी केली, गेलेला सामना परत आणला, हिटमॅन रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव