पहिल्या टी ट्वेण्टीत पराभव, भारतापेक्षा मुंबई इंडियन्स भारी, डिवचणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधाराला जाफरचं उत्तर

भारतीय संघाचा डिवचणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधाराला भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय. | Wasim Jaffer Michel Vaughan

पहिल्या टी ट्वेण्टीत पराभव, भारतापेक्षा मुंबई इंडियन्स भारी, डिवचणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधाराला जाफरचं उत्तर
Wasim Jaffer Michel Vaughan
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 12:39 PM

मुंबई : भारतीय संघाचा पहिल्या टी ट्वेन्टीत इंग्लंडने 8 विकेट्ने दणदणीत पराभव केला (Ind Vs Eng T20). साहेबांनी दमदार विजय मिळवल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने भारतीय संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ भारी असल्याचं म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या टीकेला भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय. (Wasim Jaffer Reply England Ex Captain Michel Vaughan over Mumbai Indians Better than team india Statement)

मायकल वॉन काय म्हणाला?

भारतीय संघावर नेहमी टीकाटिप्पणी करणाऱ्या वॉनने पहिल्या टी ट्वेन्टीतल्या पराभवानंतरही भारतीय संघाला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याने भारतीय संघाची तुलना मुंबई इंडियन्सची केली. तसंच भारतीय संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ भारी असल्याचं ट्विट त्याने केलं.

वॉनच्या ट्विटनंतर अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भारतीय प्रेक्षकांनी वॉनला चांगलंच फैलावर घेतलं. टेस्टमध्ये आमच्या कर्नाटकची टीम इंग्लंडपेक्षा भारी आहे, असं एका युझर्सने ट्विट केलं. तर दुसऱ्या एका युझर्सने त्याला कसोटी मालिकेची आठवण करुन दिली. तो म्हणतो आणखी काही काळ वाट बघा.. इंग्लंडची जी परिस्थिती कसोटीत झाली होती तीच आता टी ट्वेन्टीत देखील होणार आहे. मात्र या सगळ्यात भारतीय संघाचा माजी सलामीवीर वासीम जाफीरने दिलेलं उत्तर अनेकांना भावलं.

वसीम जाफरने काय उत्तर दिलं?

“सगळे संघ इतके भाग्यशाली नसतात की आपल्या संघात 4 विदेशी खेळाडूंना ते खेळवू शकतील”, असा जोराचा चिमटा काढत जाफरने शालजोडीतून वॉनला प्रत्युत्तर दिलं. एकंदरित जाफरचा बाण इंग्लंडच्या संघात असलेल्या परदेशी खेळाडूंकडे होता. त्याचं हेच एका ओळीचं प्रत्युत्तर नेटकऱ्यांना तुफान आवडलंय. त्याच्या या ट्विटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

इंग्लंडचा 8 विकेट्सने दणदणीत विजय

भारताविरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला इंग्लंड संघाने (Ind vs Eng T20) पहिल्याच टी 20 सामन्यात घेतला. अहमदाबादेत नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव करुन मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

हे ही वाचा :

IND vs ENG : साहेबांनी कसोटीचा बदला T20 मध्ये घेतला, बॅट्समनकडून भारतीय संघाला ‘गुलीगत धोका’!

Virat Kohli | ‘रनमशीन’ विराट कोहलीवर तब्बल 761 डावानंतर ओढावली नामुष्की

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.