‘ये क्या बवासीर बना दिये हो?’ Big Bash League च्या नव्या नियमांवरुन वसीम जाफरने घेतली फिरकी

| Updated on: Nov 16, 2020 | 7:41 PM

बीग बॅश लीगच्या10 व्या मोसमाचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर ही स्पर्धा येऊन ठेपली आहे.

ये क्या बवासीर बना दिये हो? Big Bash League च्या नव्या नियमांवरुन वसीम जाफरने घेतली फिरकी
Follow us on

मुंबई : आयपीएलचा 13 वा मोसम संपला आहे. त्यानंतर आता बीग बॅश लीगच्या (Big Bash League) 10 व्या मोसमाचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. 10 डिसेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत रंगत आणण्यासाठी स्पर्धेच्या आयोजकांनी 3 नवे नियम आणले आहेत. मात्र हे नियम अनेक दिग्गज क्रिकेटर आणि समीक्षकांना पटलेले नाहीत. समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनीदेखील बीग बॅश लीगच्या 3 नव्या नियमांबाबत आक्षेप घेतला आहे. तसेच आता माजी भारतीय क्रिकेटर वसीम जाफरनेही (Wasim Jaffer) बीग बॅश लीगच्या नव्या नियमांची ट्विटरवरुन खिल्ली उडवली आहे. (Wasim Jaffer trolls Big Bash Leagues new rules with Gangs Of Wasseypur meme)

बीग बॅश लीगच्या नव्या नियमांवर जाफरचा Meme द्वारे निशाणा

बीग बॅश लीगच्या नव्या नियमांचं काही खेळाडूंनी समर्थन केलं आहे, तर काहींनी त्यावर आक्षेप घेतला आहे. वसीम जाफरनेही त्यावर आक्षेप नोंदवला आहे. परंतु जाफरने याबाबत काही बोलण्याऐवजी एका मिमद्वारे बीबीएलला लक्ष्य केलं आहे. जाफरने बीग बॅश लीगच्या नव्या नियमांबाबतच्या ट्विटला रिट्विट केलं आहे आणि सोबत ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटातील एका सीनचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. स्र्किनशॉटच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “ये क्या बवासीर बना दिए हो?” जाफरचं हे ट्विट आता चांगलंच व्हायरल होत आहे. लोकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देणं सुरु केलं आहे.

काय आहेत नियम?

2 पावर प्ले

या स्पर्धेत नव्या नियमांनुसार 2 पावर प्ले असणार आहेत. सर्वसाधारणपणे पॉवर प्ले सुरुवातीच्या 6 ओव्हरपर्यंत असतो. सामन्याच्या पहिल्या पावर प्लेमध्ये 2 ओव्हरने कपात करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्येच पावर प्ले असणार आहे. तर त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या संघाला 11 व्या ओव्हरनंतर कधीही पॉवरप्लेच्या 2 ओव्हरचा वापर करता येणार आहे. या निर्णयामुळे प्रत्येक संघाला फायदा होणार आहे.

एक्स फॅक्टर खेळाडू

सामन्याच्या काही तासांआधी प्लेइंग इलेव्हन म्हणजेच अंतिम 11 खेळाडू ठरवले जातात. या खेळाडूंनाच मैदानात विरोधी संघाविरोधात खेळता येतं. मात्र नव्या नियमानुसार 12 आणि 13 क्रमांकाच्या खेळाडूला खेळण्याची संधी मिळणार आहे. सामन्याच्या 10 ओव्हरनंतर प्लेइंग इलेव्हनमधील एका खेळाडूच्या बदलीत प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नसलेल्या खेळाडूला संघात स्थान देता येणार आहे. मात्र यासाठी काही अटी आहेत. ज्या खेळाडूला बदली करण्यात येणार आहे, त्या खेळाडूने त्या सामन्यात फलंदाजी केलेली नसावी. किंवा बदली करण्यात येणारा खेळाडू जर गोलंदाज असेल तर त्याने त्या सामन्यात 1 ओव्हरपेक्षा जास्त गोलंदाजी केलेली नसावी. अशा खेळाडूंचीच बदली करुन दुसऱ्या खेळाडूंना संघात समाविष्ट करता येऊ शकणार आहे.

अतिरिक्त बोनस पॉइंट

नव्या नियमांनुसार एका सामन्यासाठी 4 पॉइंट्स असणार आहेत. यापैकी 3 पॉइंट्स हे विजयी टीमला मिळणार आहेत. तर उर्वरित 1 पॉइंट हा बोनस स्वरुपात असणार आहे. 10 ओव्हरनंतर ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल, त्या संघाला हा बोनस पॉइंट मिळणार आहे.

संबंधित बातम्या

BBL 2020 : क्रिकेट चाहत्यांमध्ये गोंधळाचं वातावरण, दिग्गज समालोचकाचं बीग बॅश लीगच्या नव्या नियमांवर आक्षेप

BBL 2020 | 2 पॉवर प्ले, बोनस पॉइंट्स, T20 मधील तीन नव्या नियमांनी रंगत

(Wasim Jaffer trolls Big Bash Leagues new rules with Gangs Of Wasseypur meme)