वसिम जाफर, 10 रणजी फायनल खेळला, सर्वच्या सर्व जिंकला!

Ranji Trophy Final नागपूर : फैज फजलच्या विदर्भ संघाने सलग दुसऱ्यांदा रणजी चषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला. विदर्भने अंतिम सामन्यात जयदेव उनाडकटच्या सौराष्ट्र संघाचा 78 धावांनी पराभव केला. विदर्भचा आदित्य सरवटे या सामन्याचा खरा हिरो ठरला. आदित्यने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 6 विकेट घेऊन, सौराष्ट्रचा डाव गुंडाळण्याचा सिंहाचा वाटा उचलला. या सामन्यात प्रथम फलंदाजी […]

वसिम जाफर, 10 रणजी फायनल खेळला, सर्वच्या सर्व जिंकला!
Wasim Jaffer
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

Ranji Trophy Final नागपूर : फैज फजलच्या विदर्भ संघाने सलग दुसऱ्यांदा रणजी चषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला. विदर्भने अंतिम सामन्यात जयदेव उनाडकटच्या सौराष्ट्र संघाचा 78 धावांनी पराभव केला. विदर्भचा आदित्य सरवटे या सामन्याचा खरा हिरो ठरला. आदित्यने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 6 विकेट घेऊन, सौराष्ट्रचा डाव गुंडाळण्याचा सिंहाचा वाटा उचलला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भचा पहिला डाव 312 धावांत आटोपला होता.

आदित्यच्या या कामगिरीने विदर्भ संघातील एका सीनिअर खेळाडूचं स्वप्न साकार झालं. रणजी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या वसिम जाफरचा हा दहावा रणजी सामना होता. विदर्भाकडून खेळताना वसिम जाफरच्या नावावर असा विक्रम झालाय, जो भारतीय डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कुणाच्याही नावावर नाही.

नागपुरात विदर्भ संघाने जिंकलेली ही रणजी ट्रॉफी वसिम जाफच्या कारकीर्दीतली दहावी ट्रॉफी ठरली. 40 वर्षी वसिम जाफरचा हा दहावा रणजी अंतिम सामना होता आणि या सर्व सामन्यांमध्ये त्याला विजयाचा साक्षीदार होता आलंय. त्याने 2015/16 पर्यंत मुंबईकडून खेळताना आठ वेळा रणजी चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता. तर गेल्या दोन मोसमांपासून तो विदर्भाकडून खेळतोय. विदर्भाने गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही विजय मिळवला.

वसिम जाफरने या विक्रमासोबत सर्वाधिक वेळा चॅम्पियन होण्याचा मनोहर हर्दिकर आणि दिलीप सरदेसाई यांचा विक्रमही मोडला. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनीही प्रत्येकी 10 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली होती. या यादीत वसिम जाफरच्या पुढे अजित वाडेकर (11) आणि अशोक मंकड (12) यांचा क्रमांक लागतो.

ऐतिहासिक सामना खेळत असलेल्या वसिम जाफरने या सामन्यात फार धावा काढल्या नाही. पहिल्या डावात 23 आणि दुसऱ्या डावात केवळ 11 धावांचं योगदान त्याला देता आलं. पण विदर्भाला फायनलपर्यंत नेण्यामध्ये वसिम जाफरचा सर्वात मोठा वाटा होता, असं म्हटलं तरीही ते चुकीचं ठरणार नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.