शोएब अख्तरची फेकूगिरी, काश्मीर काबीज करुन भारतावर हल्ला करु, ‘गजवा ए हिंद’चं स्वप्न

Shoaib Akhtar on Ghazwa e Hind | 'आधी काश्मीर काबीज करु आणि त्यांनंतर भारतावर हल्ला करु' असं धक्कादायक विधान शोएबनं केलं आहे

शोएब अख्तरची फेकूगिरी, काश्मीर काबीज करुन भारतावर हल्ला करु, 'गजवा ए हिंद'चं स्वप्न
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 2:01 PM

मुंबई : भारतात पैसा कमावणारा, भारतात कॉमेंट्री करुन भारताचं मीठ खाणारा, आणि सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) भारताच्या खेळाडूंची अनेकदा तारीफ करणारा पाकचा जलदगती गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar ).याच शोएब अख्तरनं आता भारताविरोधात गरळ ओकली आहे. आधी काश्मीर (Kashmir) काबीज करु आणि त्यांनंतर भारतावर हल्ला करु असं धक्कादायक विधान शोएबनं केलं आहे.

पाकिस्तानमधील समा टीव्ही (Pakistan Sama TV) या वृत्तवाहिनीतील एका मुलाखतीदरम्यान शोएब बरळला आहे. त्यानं ही सगळी गोष्ट गजवा ए हिंद ( Ghazwa e Hind ) या काल्पनिक कट्टरतावादी विचारधारेतून सांगितली आहे. समा टीव्हीच्या वृत्तनिवेदिकेनं याबाबत शोएबला प्रश्न विचारला, तेव्हा त्यानं हे उत्तर दिलं. शोएबचं हे विधान आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे, आणि भारतीयांकडून शोएबवर टीकेची झोड सुरु झाली आहे. (‘We will capture Kashmir, then take possession on India’, Shoaib Akhtar bats for Ghazwa e Hind)

‘गजवा ए हिंद’ची आहे तरी काय?

पाकिस्तानातल्या कट्टरतावादी विचारसरणीतून तयार झालेली काल्पनिक अशी गजवा ए हिंद ( Ghazwa e Hind) ही भविष्यवाणी. या भविष्यवाणीवरच पाकिस्तानमध्ये दहशतवादी निर्माण करण्याचा कारखाने सुरु आहेत. पाकिस्तानात कट्टरतावादी विचारसरणीचे लोक याच भविष्यवाणीला आधार मानत काश्मीरवर दावा करतात. या भविष्यवाणीत लिहलंय की, एक दिवस अखंड भारत, बांग्लादेश, म्यानमार, भूतान, नेपाळवर मुस्लिम शासन असेल. यासाठी एक मोठं युद्ध होईल. या युद्धात रक्ताच्या नद्या वाहतील, आणि हे युद्ध मुस्लिम शासक जिंकतील, आणि सगळ्या हिंदूस्तानावर मुस्लिमांचा झेंडा फडकेल.

शोएबला गजवा ए हिंद’ची स्वप्न

समा टीव्हीला दिलेला मुलाखतीत शोएब म्हणतो की, या युद्धात नद्या दोनदा रक्तानं लाल होतील. अफगाणिस्ताहून सेना अटकपर्यंत पोहचेल, उजबेकिस्तानहूनही अनेक तुकड्या भारतापर्यंत पोहचतील. या सगळा भाग लाहोरशी जोडला जाईल. काश्मीरवर ताबा मिळवल्यानंतर भारतावर आक्रमण होईल. भारताचे शासक बेड्यांमध्ये जखडले जातील असंही शोएब सांगतोय.

शोएब आधीही अनेक विधानांमुळे वादात

शोएब याआधीही भारताविरोधात गरळ ओकत आला आहे. मात्र ती गरळ पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेटपटूंपुरती मर्यादित होती. मात्र आता तो थेट भारतावर हल्ला करण्याचं बोलतो आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान ड्रग्ज घेण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. गोलंदाजीची गती वाढवण्यासाठी त्याला ड्रग्ज घेण्यासाठी सांगण्यात आलं. यासाठी दबावही टाकण्यात आला, मात्र आपण ड्रग्ज घेतलं नाही असं तो म्हणाला होता.

शोएब काय म्हणाला, तुम्हीच ऐका:

संबंधित बातम्या: 

गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल, पण….. : शोएब अख्तर   

IPL 2020 | ….म्हणून आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना संधी नाही, शाहिद आफ्रिदीची खदखद

(‘We will capture Kashmir, then take possession on India’, Shoaib Akhtar bats for Ghazwa e Hind)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.