Video | युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, काय कारण?
वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने (Chris Gayle) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) आभार मानले आहेत.
अँटिंगा : देशासह जगभरात कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मात्र कोरोनावर लसीमुळे सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरात विविध ठिकाणी नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच भारताने अनेक देशांनाही लसीचा पुरवठा केला आहे. दरम्यान वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने (West Indies cricketer Chris Gayle) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) आभार मानले आहेत. कोरोना व्हॅक्सिन वेस्टइंडिजला पाठवल्याने गेलने मोदींचे आभार मानले आहेत. गेलने एका व्हिडीओद्वारे आनंद व्यक्त केला आहे. जमैकातील भारतीय दूतावासाने ख्रिस गेलचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे. (West Indies cricketer Chris Gayle thanked Prime Minister Narendra Modi for the corona vaccine)
गेल काय म्हणतोय ?
“तुम्ही आम्हाला कोरोना व्हॅक्सिन दिलीत. त्यासाठी मी भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांचा आभारी आहे. आम्ही यासाठी तुमचे कौतुक करतो. मी लवकरच भारतात येणार आहे. पुन्हा एकदा मी तुम्ही केलेल्या सहयोगाबद्दल आभारी आहे” अशा शब्दात गेलने कौतुक केलं आहे. एकूण 17 सेंकदाचा हा व्हिडीओ आहे. ख्रिसने गुरुवारी 18 मार्चला जमैकातील भारतीय दूतावासाचे उच्चायुक्त आर. मसाकुई यांची भेट घेतली होती. यादरम्यान हा व्हिडीओ शूट करण्यात आला.
Legendary Jamaican & WI Cricketer @henrygayle thanks PM @narendramodi, the People and Government of #India for the gift of #MadeInIndia Vaccine to #Jamaica#VaccineMaitri @PMOIndia @DrSJaishankar @MEAIndia @IndianDiplomacy pic.twitter.com/fLBbhF5zTY
— India in Jamaica (@hcikingston) March 19, 2021
भारत सरकारकडून 8 मार्चला जमॅकामध्ये एस्ट्राजेनेकाचे एकूण 50 हजार कोरोना डोस पाठवण्यात आले होते. त्यानंतर जॅमेकाने भारताचे आभार मानले होते. जमॅकाचे पंतप्रधान अँड्रयू होल्नेस यांनी ट्विटद्वारे आभार मानले होते. “मला सांगताना आनंद होत आहे की, भारताने पहिल्या टप्प्यात 50 हजार कोरोना डोस पाठवले आहेत. आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. ”
व्हीव्हीयन रिचर्डसन यांनीही मानले आभार
दरम्यान काही दिवसांपूर्वी वेस्टइंडिजचे दिग्गज खेळाडू व्हीव्हीयन रिचर्डसन आणि आंद्रे रसेलनेही मोदींचे कोरोना लस पाठवल्याने आभार व्यक्त केलं होत. यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होतील. आपल्या सहकार्यासाठी आम्ही दूतावासाचे आणि सर्व भारतीयांचे आभारी आहोत, असं म्हणत रिचर्डसन यांनी आभार व्यक्त केलं होतं.
गेल आयपीएलसाठी भारतात येणार
ख्रिस गेल भारतात येणार आहे. गेल आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी भारतात येणार आहे. गेल पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. गेल्या मोसमात गेलला पहिल्या टप्प्यानंतर खेळण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे त्याला फार चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे गेलकडून या मोसमात तुफानी फटकेबाजी अपेक्षित असणार आहे.
संबंधित बातम्या :
6 बोल 23 रन्स, शार्दूलच्या हाती बोल, 2 वाईड, भारताची धडधड आणि रोहित शर्माची एन्ट्री, नेमकं काय घडलं?
भारतानं कोविडचे डोस रोखल्याचा इंग्लंडचा आरोप, सिरमनं आरोप फेटाळले, वाचा काय घडतं आहे?
(West Indies cricketer Chris Gayle thanked Prime Minister Narendra Modi for the corona vaccine)