वेस्टइंडिजचा फिरकीपटू सुनील नारायणबाबत निवड समितीचा मोठा खुलासा

श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी वेस्टइंडिजची (west indies) घोषणा करण्यात आली. या मालिकेत उभय संघात एकूण 3 सामने खेळण्यात येणार आहेत.

वेस्टइंडिजचा फिरकीपटू सुनील नारायणबाबत निवड समितीचा मोठा खुलासा
श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी वेस्टइंडिजची (west indies) घोषणा करण्यात आली. या मालिकेत उभय संघात एकूण 3 सामने खेळण्यात येणार आहेत.
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 2:56 PM

अँटिंगा : काही दिवसांपूर्वी वेस्टइंडिजची (west indies) श्रीलंका (Sri Lanka) विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी घोषणा करण्यात आली होती. यामध्ये ख्रिस गेल (Chris Gayle) आणि फिडेल एडवर्ड्ससारख्या (Fidel Edwards) अनुभवी खेळाडूंचा पुनरागमन झालं. पण या संघात फिरकी गोलंदाज सुनील नारायणला संधी मिळाली नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण आता निवड समितीने सुनील नारायणची निवड न करण्यामागचं कारण सांगितलं आहे. सुनील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही कमबॅक करण्यासाठी सज्ज नाही, अशी माहिती निवड समितीचे रोजर हार्पर यांनी दिली. सुनीलनेच आपण क्रिकेट खेळण्यास असमर्थ असल्याचं निवड समितीला कळवलं होतं. (west indies selection committee sunil narine revels reason why not playing in international cricket)

सुनील गेल्या 2 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याने आपला अखेरचा सामना ऑगस्ट 2019 मध्ये खेळला होता. त्याने सुपर कप 50 स्पर्धेत त्रिनिदाद एंड टोबागोसाठी 4 सामन्यात प्रतिनिधित्व केलं. दरम्यान त्याला दुखापत झाल्याने शनिवारी झालेल्या अंतिम सामन्याला मुकावे लागले होते.

आयपीएलमध्ये बंदी

सुनील आयपीएलमध्ये गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. या मोसमात त्याच्यावर संश्यास्पद बोलिंग एक्शनमुळे त्याच्यावर बंदी टाकण्यात आली होती. पण ही बंदी काही सामन्यांनंतर उठवण्यात आली होती.

9 वर्षांनंतर फिडेलचे कमबॅक

तब्बल 9 वर्षानंतर वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्सचे विंडिज संघात पुनरागमन होत आहे. फिडेलने अखेरचा सामना 2012 मध्ये खेळला होता. वेगवान गोलंदाजीला आणखी धार मिळवून देण्यासाठी फिडेलला संधी देण्यात आली. मला संघात परतायचंय, अशी इच्छा फिडेलने कर्णधार कायरन पोलर्ड आणि मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांच्याकडे बोलून दाखवली होती. फिडेलने विंडिजसाठी एकूण 125 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे.

श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विंडिज टीम

कायरन पोलार्ड, निकोलस पूरन, फॅबियन एलेन, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, फिडेल एडवर्ड्स , आंद्रे फ्लेचर, जेसन होल्डर, अकील होसेन, केविन सिनक्लेयर, एविन लुईस, ओवेबड मॅकोए, लेंडल सिमन्स आणि रोवमॅन पॉवेल.

टी 20 सामन्याचे वेळापत्रक

पहिली टी 20 मॅच, 5 मार्च, अँटिगा

दुसरी टी 20 मॅच, 7 मार्च, अँटिगा

तिसरी टी 20 मॅच, 9 मार्च, अँटिगा

संबंधित बातम्या :

WI vs SL | गेलची देशासाठी PSL मधून माघार, आक्रमक गोलंदाजाचं 9 वर्षानंतर कमबॅक, श्रीलंका विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी विंडिजची घोषणा

(west indies selection committee sunil narine revels reason why not playing in international cricket)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.