Video : स्वप्नातही कधी विचार केला नसेल की असं आऊट होऊ…, या व्हिडीओची क्रिकेट विश्वात चर्चा
श्रीलंकन बॅट्समन दानुष्का गुनाथिलकाला (Dhanushka Gunathilaka) वादग्रस्त पद्धतीने आऊट दिलं गेलं. या प्रकाराने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.
एंटिगा : वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंकेदरम्यान (West indies vs Sri lanka) खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान मोठा वाद पाहायला मिळाला. सामन्यात श्रीलंकन बॅट्समन दानुष्का गुनाथिलकाला (Dhanushka Gunathilaka) वादग्रस्त पद्धतीने आऊट दिलं गेलं. या प्रकाराने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. (West indies vs sri lanka Dhanushka Gunathilaka obstucting the Field)
दानुष्काला आऊट देण्यावरुन वाद
दानुष्का गुनाथिलकावर रनआऊटपासून वाचण्याकरिता जाणून बुजून चेंडू अडवल्याचा आरोप आहे. याच कारणामुळे थर्ड अंपायरने दानुष्काला obstucting the Field (फिल्डिंगमध्ये अडथळा आणणे) आऊट घोषित केलं. थर्ड अंपायरच्या याच निर्णयावर आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
श्रीलंकेच्या बॅटिंगवेळी 22 व्या ओव्हरदरम्यान दानुष्का बॅटिंग करत असताना त्याने एक शॉट खेळला. शॉट खेळून रन्स घेण्यासाठी तो क्रीजच्या बराच पुढे आला होता. त्यावर दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या बॅट्समनने रन्स घेण्यास नकार दिला. त्यानंतर क्रीजमध्ये परत येण्यादरम्यान त्याच्या पायामध्ये बॉल घुटमळला.
हा सगळा प्रकार पाहून वेस्ट इंडिजचा किरन पोलार्ड भडकला. त्याने झाला प्रकार बरोबर नाही, असा इशारा करत जोरदार अपील केली. मैदानावरच्या पंचानी हे प्रकरण थर्ड अंपायरकडे सुपूर्द केलं. थर्ड अंपायरने फिल्डिंगमध्ये अडथळा आणला म्हणून दानुष्काला आऊट घोषित केलं.
पाहा व्हिडीओ :
This rare dismissal has sparked outrage. Surely it wasn’t deliberate! ??
MORE: https://t.co/roxIfLJm8E
?@windiescricket pic.twitter.com/CRcYmk2l08
— Fox Cricket (@FoxCricket) March 11, 2021
(West indies vs sri lanka Dhanushka Gunathilaka obstucting the Field)
हे ही वाचा :