MS Dhoni : IPL मधील धोनीच्या निवृत्तीबद्दल CSK च्या अधिकाऱ्याचा मोठा खुलासा, माहीचा प्लान..
महेंद्रसिंग धोनीचा यंदाचा हा आयपीएलचा हा शेवटचा सीझन आहे, अशा चर्चा दरवर्षी सुरू असतात. त्याप्रमाणे यंदाही IPL 2024 मध्ये धोनी शेवटचं खेळणार अशा बातम्या सुरू झाल्या. मात्र त्याचा नेमका प्लान काय आहे, याबद्दल सीएसके टीमच्या एका अधिकाऱ्यानेच मोठा खुलासा केला आहे. धोनीने याबद्दल CSK मॅनेजमेंटबद्दल चर्चा केल्याचे त्यांनी नमूद केले.
IPL 2024 चा हा सीझन आता अखेरच्या टप्प्यात आहे. येत्या काही दिवसातच या सीझनचा शेवटचा सामना होईल आणि आयपीएलचा नवा विजेता मिळेल. मात्र असे असले तरी आयपीएलचे अनेक चाहते नाराज आहेत कारण यंदा चेन्नईचा संघ आणि पर्यायाने धोनीही प्ले-ऑफमध्ये पोहोचला नसल्याने अनेकांची निराशा झाली आहे. सीएसकेचा प्रवास आधीच थांबला आहे. त्यामुळे आता धोनी यापुढे खेळेले की नाही ? हा त्याचा आयपीएलमधील शेवटचा सामना होता का ? हा त्याचा IPLचा शेवटचा सीझन तर नाही ? आता खेळाडू म्हणून धोनी पुन्हा आयपीएलमध्ये दिसणार नाही का ? असे एक ना अनेक सवाल चाहत्यांच्या मनात असून त्याचं उत्तर कधी स्पष्ट होणार, धोनीची पुढची भूमिका काय, याकडचे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याबद्दल विविध कयासही व्यक्त केला जात आहे. जेवढी लोकं, तेवढी मत या नात्याने अनेक जण आपापलं मत मांडत आहेत. पण खरी परिस्थिती काय आहे, याबाबत चेन्नईच्या (CSK) टीमशी निगडीत एका अधिकाऱ्याने खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाला CSKचा अधिकारी ?
चेन्नई सुपर किंग्ज या टीमशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धोनीने याबाबत व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना सीएसकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. IPL 2024ची विजेती ट्रॉफी आता उचलता येणार नसल्याने धोनीला खूप दु:ख झाले आहे, असेही तो अधिकारी म्हणाला. IPL 2024 च्या शेवटच्या ग्रुप मॅचमध्ये सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाविरुद्ध 27 धावांनी पराभव पत्करावा लागल्यामुळे चेन्नईचा संघ हा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. रिपोर्टनुसार, त्या पराभवानंतर धोनी रांचीला गेला होता. सीएसके कॅम्पमधून घरी जाणारा धोनी हा पहिली व्यक्ती होता.
IPL सोडतोय, असं धोनीने अजून तरी सांगितलं नाही
महेंद्रसिंग धोनीच्या खेळाचे लाखो चाहते आहेत, त्याचा खेळ पाहण्यासाठी सगळेच आतुर असतात. पण यंदा त्याचा खेळ आणखी पाहता येणार नसल्याने चाहते निराश झाले आहेत. याचदरम्यान धोनीच्या निवृत्तीबाबतही विविध चर्चा सुरू आहेत. त्याबद्दल चेन्नईच्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली. IPL मधून रिटायर होण्याबाबत धोनी अजूनतरी काहीही बोललेला नाही. IPL मधून निवृत्तीबाबात माहीने अद्याप कोणतेही संकेत दिलेले नाहीत. किंवा CSKच्या टीममधील अथवा व्यवस्थापनातील कोणत्याही अधिकाऱ्याशी देखील त्याने चर्चा केली नाही किंवा आपण आयपीएलमधून रिटायर होतोय असं सांगितलेलं नाही, असं त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरच या विषयावर अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू, असं धोनीने सांगितल्याचे त्याने नमूद केलं.
CSK मॅनेजमेंट पाहतंय धोनीच्या निर्णयाची वाट
सीएसकेच्या त्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, धोनीच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जाईल. तो जो निर्णय घेईल तो संघाच्या हिताचा असेल.(हे) त्याने नेहमीच केले आहे. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा प्रवास पाचव्या स्थानावर संपला आहे. चेन्नई आणि आरसीबीचे 14-14 गुण होते. पण, चांगल्या रनरेटमुळे आरसीबीला प्लेऑफचे तिकीट मिळाले.