Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहबद्दल सौरव गांगुली मोठं वक्तव्य
विशेष म्हणजे सौरव गांगुलीने फक्त दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून बुमराहने माघार घेतल्याचं वक्तव्य केलं आहे.
मागच्या दोन दिवसांपासून जसप्रीत बुमराहबाबत (Jasprit Bumrah) अनेकांनी वक्तव्ये केली आहेत. कारण तो आजारी असल्यामुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे, अशी सोशल मीडियावर (Social Media) चर्चा आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या (Australia) विरोधात दोन सामने खेळले आहेत. त्यानंतर त्याला पुन्हा दुखापत झाली आहे.
विशेष म्हणजे सौरव गांगुलीने फक्त दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून बुमराहने माघार घेतल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत तो पुन्हा खेळण्याची शक्यता आहे. त्याच्याबाबत आता कोणतंही वक्तव्य न केलेलं बरं असं देखील गांगुली म्हणाला आहे.
आशिया चषकात गोलंदाजांनी खराब कामगिरी केली, त्यामुळे टीम इंडिया आशिया चषकातून बाहेर पडली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाने मालिका जिंकली होती.