आचरेकर सरांनी जेव्हा सचिनची शाळा घेतली होती!
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घडवणारे त्यांचे गुरु पद्मश्री रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. आचरेकर सर हे स्वत: एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू होते. त्यांचा जन्म 1932 साली स्वातंत्र्यपूर्व काळात झाला होता. सचिन तेंडुलकरला घडवण्यात सर्वात मोठा हात आचरेकर सरांचा होता. आचरेकर सर यांनी मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये अनेकांना […]
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घडवणारे त्यांचे गुरु पद्मश्री रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. आचरेकर सर हे स्वत: एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू होते. त्यांचा जन्म 1932 साली स्वातंत्र्यपूर्व काळात झाला होता. सचिन तेंडुलकरला घडवण्यात सर्वात मोठा हात आचरेकर सरांचा होता. आचरेकर सर यांनी मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये अनेकांना क्रिकटचे धडे दिले. त्यांनी सचिनच नाही तर विनोद कांबळी, अजित आगरकर यांनाही क्रिकेट शिकवले.
आचरेकर सरांनी 1943 साली क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 1945 साली न्यू हिंदू स्पोर्ट्स क्लब जॉईन केले. ते यंग महाराष्ट्र XI, गुलमोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट कडूनही क्रिकेट खेळले आहेत. त्यांनी शिवाजी पार्क येथे कामथ मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली. याच क्लबमध्ये सचिनने ट्रेनिंग घेतली.
सचिनने 11 वर्षांच्या वयात आचरेकर सरांचा क्लब जॉईन केला. आचरेकर सरांना आधीपासून माहित होते की सचिन हा विनोद कांबळीपेक्षा जास्त चांगला खेळाडू आहे. पण एका सामन्यात सचिन आणि विनोद कांबळी हे दोघेही खेळत असताना विनोद कांबळीने शतक ठोकले, तर सचिन 78 धावांवर बाद झाला होता. आचरेकर सरांनी तो सामना टीव्हीवर बघितला. दुसऱ्या दिवशी आचरेकर सरांनी दोघांनाही मैदानावर बोलावले आणि त्यांनी सचिनला फटकारले. कारण त्यांना माहित होते की, सचिन आपला नैसर्गिक खेळ खेळत नव्हता.
सचिन सांगतो की, आचरेकर सर हे खूप स्ट्रिक्ट होते. मागील वर्षी सचिनने शिक्षक दिनाला पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत याबाबत सांगितले होते. त्यांनी सचिनला शिस्त लावली होती. त्यांच्यामुळेच सचिन हा ‘द सचिन तेंडुलकर’ बनला.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घडवणारा हा अवलिया आता काळाच्या पडद्याआड हरवला आहे. आचरेकर सरांच्या निधनाने क्रिकेट विश्वात तसेच क्रिकेट चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तर अनेकांनी यावर खेद व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही ट्विटरच्या माध्यमातून आचरेकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आचरेकर यांच्या निधनाने एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला! मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली pic.twitter.com/xXJQxNLiZD
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 2, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’ अशा शब्दांत आचरेकर सरांना श्रद्धांजली वाहिली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!#RamakantAchrekar pic.twitter.com/bfId0LtdqP
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) January 2, 2019
तर बॉलीवूड अभिनेता आमिर खाननेही आचरेकर सरांना श्रद्धांजली वाहिली.
My heartfelt condolences to the family of Mr Ramakant Achrekar, to Sachin, and to all those close to him. We will always remember him with great fondness and respect for his contribution to Indian cricket. May his soul rest in peace. a.
— Aamir Khan (@aamir_khan) January 2, 2019
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हान यांनी ‘ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक पद्मश्री रमाकांत आचरेकर यांच्या निधनामुळे भारतरत्न सचिन तेंडुलकरसह क्रिकेटपटूंची एक पिढी घडवणारे भिष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेले. रमाकांत आचरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’ असे ट्वीट केले.
ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक पद्मश्री रमाकांत आचरेकर यांच्या निधनामुळे भारतरत्न सचिन तेंडुलकरसह क्रिकेटपटूंची एक पिढी घडवणारे भिष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेले. रमाकांत आचरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/rfupBvBhTi
— Ashok Chavan (@AshokChavanINC) January 2, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आचरेकर सरांना श्रद्धांजली वाहिली.
रमाकांत आचरेकर यांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावर तळपणारे क्रिकेटपटू आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाने घडवले. मार्गदर्शकाच्या भूमिकेतील आचरेकरांना क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणून ओळखले गेले.#RamakantAchrekar pic.twitter.com/ndvQYWSz27
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 2, 2019