Chris Gayle : नेमका ख्रिस गेलायं कुठं ? 43 व्या वाढदिवसाच्या पार्टीबद्दल काय खास आहे ?
विशेष म्हणजे ख्रिस गेलचा आज वाढदिवस आहे. गेलचा आज 43 वा वाढदिवस आहे.
वेस्ट इंडीज टीम माजी फलंदाज ख्रिस गेल (chris gayle) त्यांच्या तुफान फटकेबाजीमुळं देशभरात ओळखला जातो. त्याचे चाहते (cricket fan) सुद्धा त्यांच्या खेळीची वाट पाहत असतात. कारण कधी कोणता चेंडू सीमेबाहेर जाईल असा नेहमी खेळ ख्रिस गेलकडून पाहायला मिळाला आहे. अनेक गोलंदाजांना (bowling) गेलनी सळोकीपळो करुन सोडले होते.
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
विशेष म्हणजे ख्रिस गेलचा आज वाढदिवस आहे. गेलचा आज 43 वा वाढदिवस आहे. आज त्याच्याकडून मोठ्या पार्टीचं आयोजन केलं असेल. कारण या आगोदर सुद्धा ख्रिस गेलने अनेक पार्ट्या केल्या आहेत.
Full Music Video Out Now! ?? https://t.co/lv43Y3hMpZ
— Chris Gayle (@henrygayle) June 5, 2022
वेस्ट इंडीज खेळाडूंना डान्स करण्याचं प्रचंड वेड आहे. एखादा आनंदाचा क्षण झाल्यानंतर तो साजरा करण्याठी अनेक वेस्ट इंडीज खेळाडूंचा डान्स पाहायला मिळायचा.
मागच्या चार दिवसांपासून जमैकामध्ये एका खास शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातून मिळालेला सगळा पैसा गोरगरीब जनतेच्या कामासाठी वापर असल्याचे गेलने स्पष्ट केले आहे. वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आले आहे.
ख्रिस गेलचा वाढदिवस मागच्या चार दिवसांपासून सुरु आहे. यंदाचा वाढदिवस स्पेशल असल्याची चर्चा सुद्धा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यापासून ख्रिस गेल कोणत्याचं मैदानावर अद्याप दिलेला नाही.
ख्रिस गेलकडे एकहाती सामना जिंकून द्यायची ताकद होती. कारण त्याच्या एकटाच्या चांगल्या कामगिरीमुळे वेस्ट इंडिज अनेकदा सामने जिंकला आहे.