कोण आहे तो माइंड गुरू? ज्यानं डी गुकेशला बुद्धिबळात विश्व चॅम्पियन बनवलं, क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघालाही दिले होते धडे

डोमराजून गुकेश हा वयाच्या 18 वर्षी जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे. त्याने गत विजेता चॅम्मियन चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला.

कोण आहे तो माइंड गुरू? ज्यानं डी गुकेशला बुद्धिबळात विश्व चॅम्पियन बनवलं, क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघालाही दिले होते धडे
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 8:49 PM

डोमराजून गुकेश हा वयाच्या 18 वर्षी जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला आहे. तीन आठवडे चाललेल्या या बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये त्याने गत विजेता चॅम्मियन चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. याचबरोबर त्याने गॅरी कास्पारोव्हला मागे टाकत जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनण्याचा मान पटकवला आहे. भारताच्या या ग्रँडमास्टरने 14व्या डावात डिंग लिरेनचा पराभव करत जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा आपल्या खिशात घातली आहे.

गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेक मेट दिला आहे. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याचं गुकेश याचं स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी त्यानं माइंड गुरु पॅडी अप्टन यांचं मार्गदर्शन घेतलं. यापूर्वी पॅडी अप्टन यांनी 2011 च्या क्रिकेट विश्वचषक विजेता भारतीय संघ, आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाला देखील मार्गदर्शन केलं आहे.पॅडी अप्टन गेल्या चार महिन्यांपासून गुकेशसोबत असल्याची माहिती समोर आली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार संदीप सिंघल यांनी गुकेश आणि पॅडी अप्टन यांची भेट घडवून आणली होती. संदीप सिंघल हे पाचवेळा बुद्धिबळात विश्व चॅम्पियन राहिलेल्या विश्वनाथ आनंद यांच्यासोबत वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमीचे सह संस्थापक आहेत.खेळावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करण्यासाठी गुकेशला पॅडी अप्टन यांची खूप मदत झाली. पॅडी अप्टन यांच्यामुळे गुकेशला मन स्थिर ठेवण्यासाठी मोलाची मदत झाली.

कोण आहे डोमराजून गुकेश?

सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला डी गुकेश हा मुळचा चेन्नईमधील आहे. डी गुकेशची आई पेशानं मायक्रोबायोलॉजिस्ट तर वडील डॉक्टर आहेत. मात्र गुकेशला बुद्धिबळाची आवड होती. डी गुकेशने वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. बुद्धिबळ खेळायला सुरुवात केल्यानंतर गुकेश 11 वर्षांनी वर्षांनी जगतजेत्ता बनला आहे. त्याने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करत जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेवर आपलं नाव कोरलं आहे. जो जगतजेत्ता बनला आहे. या सर्व प्रवासात माइंड गुरु पॅडी अप्टन त्याच्यासोबत होते.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.