500 सामन्यांत सतत न हरणारे कुस्तीपटू कोण?; रुस्तम ए हिंद किताब मिळविणाऱ्या या खेळाडूचा होता दबदबा

इटलीतील कुस्तीपटूला हरवून त्यांना ५० डॉलर मिळाले. १९५० मध्ये त्यांनी चँपियन ऑफ मलेशियाचा किताब जिंकला. त्याकाळल्या २०० किलो वजनाच्या किंग काँग या कुस्तीपटूला त्यांनी हरविले.

500 सामन्यांत सतत न हरणारे कुस्तीपटू कोण?; रुस्तम ए हिंद किताब मिळविणाऱ्या या खेळाडूचा होता दबदबा
दारा सिंग, कुस्तीपटू
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 7:02 PM

नवी दिल्ली : दारा सिंग हे नाव घेताचं आठवते ती कुस्ती. या कुस्तीपटूनं जगातील कुस्तीपटूंना पाणी पाजले होते. 130 किलो वजन असताना 200 किलो वजनाच्या कुस्तीपटूला हरविले होते. तेव्हापासून जगात त्यांच्या नावाचा दबदबा होता. दारा सिंग यांना रुस्तम ए हिंदची उपाधी बहाल करण्यात आली. दारा सिंग हे पंजाबचे कुस्तिपटू होते. ५०० सामन्यांपैकी एकही सामना ते हरले नव्हते. जगात भारतीय कुस्तिपटूंना वेगळी ओळख निर्माण करून दिली. रामायणात त्यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि राजकारणातही त्यांनी सहभाग घेतला. एक वेळा त्यांनी २०० किलो वजनाचे ऑस्ट्रेलियाचे कुस्तीपटू किंग काँगला हरविलं होतं. तेव्हापासून त्यांची चर्चा जगात सुरू झाली.

दारासिंग यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२८ ला जन्म झाला. ते अमृतसरच्या एका छोट्या गावात जन्माला आले. दारा सिंग यांचं खरं नाव दीदारसिंह रंधावा होते. लहानपणी त्यांचं मन अभ्यासात लागत नव्हतं.

लहानपणी घरी शेतीची कामं करत असतं. ९ वर्षांचे असताना त्यांचं लग्न झालं. त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या महिलेशी त्यांचं लग्न झालं. त्यामुळं दारा सिंग यांनाही १०० बदाम, दूध, दही अशी खुराक घेत होते. ते १७ वर्षांचे असताना त्यांना पहिला मुलगा झाला.

सिंगापुरातून कुस्तीत दबदबा

पहिल्या पत्नीसोबत त्यांचा घटस्फोट झाला. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना दोन मुलं व तीन मुली झाल्या. सिंगापूरमधून त्यांनी कुस्तीची सुरुवात केली. १९४७ साली ते एका नातेवाईकासोबत ते पैसे कमविण्यासाठी सिंगापूरला गेले. एका मिलमध्ये ते काम करत होते. त्यानंतर त्यांनी कुस्तीचे प्रशिक्षण घेतले.

मुंबईत बनले भारतीय चँपियन

इटलीतील कुस्तीपटूला हरवून त्यांना ५० डॉलर मिळाले. १९५० मध्ये त्यांनी चँपियन ऑफ मलेशियाचा किताब जिंकला. त्याकाळल्या २०० किलो वजनाच्या किंग काँग या कुस्तीपटूला त्यांनी हरविले. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेचं नाही. १९५३ मध्ये मुंबईत ते भारतीय चँपियन बनले. १९५९ मध्ये कोलकाता येथे त्यांनी जगातील सर्वोत्तम कुस्तीपटूंना हरविले.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.