RR vs KKR, IPL Match Prediction | कोलकाता विरुद्धच्या लढतीआधी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन टेन्शन फ्री, वाचा नक्की कारण काय?

आयपीएलच्या 14 व्या मोसमात (Ipl 2021 Today Match) आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगणार आहे.

RR vs KKR, IPL Match Prediction | कोलकाता विरुद्धच्या लढतीआधी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन टेन्शन फ्री, वाचा नक्की कारण काय?
Today Match Prediction of Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders | आयपीएलच्या 14 व्या मोसमात आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे.
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 4:47 PM

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 18 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. कोलकाताच्या नेतृत्वाची जबाबदारी ही इयोन मॉर्गनच्या खांद्यावर आहे. तर राजस्थानची धुरा युवा संजू सॅमसनकडे आहे. राजस्थान पॉइंट्सटेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर म्हणजेच 8 व्या क्रमांकावर आहे. त्यानंतरही राजस्थान कोलकाता विरुद्धच्या लढतीआधी टेन्शन फ्री आहे. (who will win rr vs kkr ipl 2021 today match rajasthan royals vs kolkata knight riders match prediction previous match 24 april in marathi)

नक्की कारण काय?

उभयसंघाचा या मोसमातील आजचा पाचवा सामना आहे. हे दोन्ही संघ या पर्वात पहिल्यांदा आमनेसामने उभे ठाकणार आहेत. उभयसंघांनी या मोसमातील आतापर्यंत प्रत्येकी 4 सामने खेळले आहेत. या 4 पैकी 3 सामन्यात दोन्ही संघांचा पराभव झाला आहे. तर केवळ 1 सामन्यात विजय मिळवता आला आहे. राजस्थान गुणतालिकेच 8 व्या तर कोलकाता 7 व्या क्रमांकावर आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्याआधी संजू सॅमसन आणि राजस्थान निश्चिंत असण्यामागे मोठं कारण आहे. ते म्हणजे कोलकाताची वानखेडेवरील आकडेवारी.

कोलकाताची वानखडेवरील आकडेवारी

कोलकाताची वानखेडेवरील कामगिरी निराशाजनक आहे. कोलकाताने आतापर्यंत वानखेडेवर एकूण 9 सामने खेळले आहेत. यापैकी केवळ 1 सामन्यात कोलकाताचा विजय झाला आहे. तर उर्वरित 8 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे कोलकाता विरुद्धच्या लढतीआधी संजू सॅमसन आणि राजस्थान निश्चिंत आहे. दोन्ही संघ पॉइंट्सटेबलमध्ये तळाशी आहेत. यामुळे दोन्ही संघांसाठी विजय हा गरजेचा असणार आहे.

आकडेवारी कोणाच्या बाजूने?

उभयसंघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये कोलकाता वरचढ राहिली आहे. 12 सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 10 वेळा मात केली आहे. तर एकमेव सामना हा बरोबरीत सुटला आहे. तसेच हे दोन्ही संघ 18 वेळा भारतात आमनेसामने भिडले आहेत. यापैकी राजस्थानने 8 सामने तर कोलकाताने 9 मॅचेस जिंकल्या आहेत. यामुळे या सामन्यात नक्की कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.

राजस्थानसमोर कामगिरी सुधारण्याचं आव्हान

राजस्थानचे फलंदाजी हे विशेष काही करत नाहीयेत. त्यामुळे राजस्थानसमोर फलंदाजी सुधारण्याचे आव्हान आहे. राजस्थानने या मोसमातील आतापर्यंत खेळलल्या एकूण सामन्यांतील पावर प्लेमध्ये सर्वाधिक 10 विकेट्स गमावल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात राजस्थान बाजी मारणार की कोलकाता इतिहास घडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2021, RR vs KKR Head to Head | राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने, कोण मारणार बाजी?

KKR vs RR, IPL 2021 Live Streaming : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सामना कधी, कुठे, केव्हा?

(who will win rr vs kkr ipl 2021 today match rajasthan royals vs kolkata knight riders match prediction previous match 24 april in marathi)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.