T20 World Cup 2022: भारत-इंग्लंड यांच्यातली मॅच कोण जिंकणार? शाहिद आफ्रिदीची पुन्हा भविष्यवाणी
पाकिस्तानची टीम आज कशी खेळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे
नवी दिल्ली : आज न्यूझिलंड (NZ) आणि पाकिस्तान (PAK) यांच्यात मॅच सिडनी (Sydney) येथे मॅच होणार आहे. आजच्या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम अंतिम सामना खेळेल. उद्या टीम इंडियाचा (IND) इंग्लंडच्या (ENG) टीमसोबत सामना होणार आहे. दोन्ही टीमने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडिया जिंकेल अशी चर्चा सोशल मीडियावर कालपासून सुरु आहे. कारण टीम इंडियाचे चार खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यांना रोखणं मुश्कील असल्याचं एका चाहत्यानं सोशल मीडियावर म्हटलं आहे.
पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी हा सुद्धा सोशल मीडियावर अधिक चर्चेत असतो. तो प्रत्येकवेळी टीमला सल्ले देत असतो. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात उद्या मॅच होणार आहे. त्याबाबत आफ्रिद्रीने भविष्यवाणी केली आहे, उद्या इंग्लंडची टीम जिंकेल असं तो म्हणाला आहे. त्याचबरोबर टीम इंडियासाठी उद्याचा सामना सोप्पा नाही. कारण इंग्लंड टीममध्ये संमिश्र खेळाडू असल्याचं आफ्रिदीने म्हटलं आहे.
उद्याच्या सामन्यात जी टीम चुका करणार नाही, त्या टीमचा विजय होईल असंही समां टीव्हीशी बोलताना आफ्रिदी म्हणाला आहे. आतापर्यत टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 20 मॅच झाल्या आहेत. त्यापैकी 12 मॅच टीम इंडियाने जिंकल्या आहेत,तर 8 मॅच इंग्लंडने जिंकल्या आहेत.
पाकिस्तानची टीम आज कशी खेळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण आजचा सामना दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.