IPL 2022, PBKS vs CSK, Match Prediction : आज धोनी पुन्हा करिश्मा दाखवणार, की पंजाब आगेकूच करणार?
आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये आज पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. पंजाब आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये सात सामने खेळला आहे. त्या सात सामन्यापैकी पंजाबने तीन सामने जिंकले आहे. तर 4 सामन्यात तो पराभूत झालाय. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबला सहा गुण मिळाले आहे. तर त्यांचा रन रेट -0.562 आहे. चेन्नई सुपर किंग्सने देखील सात सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यात चेन्नईला यश आलंय तर पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. चेन्नई सुपर किंग्सचा रन रेट हा -०.534 आहे. तर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला चार पॉईंट्स मिळाले आहे. आज होणाऱ्या सामन्यात कोणत्या संघाला आगेकूच करता येते ते पाहणं महत्वाचं ठरेल.
धोनी करिश्मा दाखवणार
महेंद्र सिंग धोनीच्या करिष्म्यावर पुन्हा एकदा आज चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार आहे. गतविजेत्या चेन्नईला या मोसमात चांगली कामगिरी करता आली नाही. सीएसकेचा संघ ज्या प्रकारे क्रिकेट खेळला आहे. त्या प्रकारची ते त्यांच्या चाहत्यांना देखील आवडलेलं नाही. मागील सामन्यात मुंबई इंडियन्सवर तीन विकेट मिळवलेला शानदार विजय आणि त्यात धोनीची कामगिरी चेन्नईसाठी टॉनिक ठरली आहे. धोनीनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की त्याला जगातील सर्वोत्तम फिनिशर का म्हटलं जातं ते. त्याने अखेरच्या षटकात एक षटकार आणि दोन चौकार मारून संघाला चमत्कारिक विजय मिळवून दिला होता.
पंजाबची अवस्था बिकट
दिल्ली कॅपिटल्सने पंजाबचा नऊ गडी राखून पराभव केला होता. पंजाबचे फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करत नाहीत. शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टन आणि शाहरुख खान यांनी सातत्यपूर्ण खेळ केला नाही. तर जॉनी बेअरस्टोला चार संधी मिळाल्या आणि चार त्याने गमावल्या. गोलंदाजीत पंजाबकडे कागिसो रबाडा आहे. तर अर्शदीप सिंगही फॉर्मात आहे. वैभव अरोराला अजून चांगली कामगिरी करायची आहे. वेगवान गोलंदाज अष्टपैलू ओडियन स्मिथची भूमिका महत्वाची असली तरी तो नेहमीच्या शैलीत खेळू शकला नाही.
पॉईंट्स टेबलमधील स्थिती
आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबला सहा गुण मिळाले आहे. तर त्यांचा रन रेट -0.562 आहे. तर चेन्नई सुपर किंग्सने देखील सात सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यात चेन्नईला यश आलंय तर पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. चेन्नई सुपर किंग्सचा रन रेट हा -०.534 आहे. तर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला चार पॉईंट्स मिळाले आहे.
इतर बातम्या