T20 World Cup 2022 : इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातही पाऊस पडणार का ? जाणून घ्या हवामान अंदाज
आजची मॅच मेलबर्नमध्ये होणार आहे.
मेलबर्न : ऑस्ट्रेलियात (Australia) सद्धा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. त्यामुळे मैदान व्यवस्थापण टीमला मैदानाची अधिक काळजी घ्यावी लागत आहे. सकाळी अफगाणिस्तान आणि आर्यलॅंड यांच्यातील मॅच पावसामुळे रद्द झाली. दोन्ही टीमला 1-1 गुण देण्यात आला आहे. इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज मॅच होणार आहे. तिथंही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तान आणि आर्यलॅंड यांच्यात ज्या मैदानावर मॅच होणार होती, तिथं अधिक पाऊस पडल्याने आजची मॅच रद्द करण्यात आली.
इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज रोमांचक मॅच होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही टीमला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी आजची मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. दोन्ही टीममध्ये गुणवंत खेळाडू असून सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
आजची मॅच मेलबर्नमध्ये होणार आहे. तिथं मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच आजही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे समजा पाऊस पडला तर विश्वचषक स्पर्धेत पुढची अनेक समीकरणे बदलतील.
इंग्लंड – जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड
ऑस्ट्रेलिया – अॅरॉन फिंच , डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड