Vijay Hazare Trophy Final: ऋतुराज गायकवाड आज पुन्हा मोठी खेळी करणार का ? जयदेव उनाडकटशी आज संघर्ष
ऋतुराज गायकवाडच्या बॅटची जादू दिसणार की जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीचा चमत्कार ? आजच्या रोमांचक मॅचकडे चाहत्यांचे लक्ष
मुंबई : विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम (Vijay Hazare Trophy Final) सामना आज होणार आहे. महाराष्ट्र आणि सौराष्ट्र (Saurashtra vs Maharastra) यांच्यात आज अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र टीमचा सध्या अधिक फॉर्म असेलला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) कशी खेळी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण जयदेव उनाडकट हा सौराष्ट्र टीममधून खेळत आहे. त्यामुळे दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ऋतुराज गायकवाडने चांगली फलंदाजी केली आहे.
ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेश विरुद्धच्या मॅचमध्ये चांगली खेळी केली. त्याने त्या मॅचमध्ये द्विशतक झळकावलं, तसेच एका ओव्हरमध्ये 42 धावा काढण्याचा विक्रम सुद्धा आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे आरामविरुद्धच्या मॅचमध्ये सुद्धा त्याने चांगली खेळी केली. त्या सामन्यात सुद्धा त्याने शतक झळकावलं.
आजच्या सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण सौराष्ट्र टीममध्ये जयदेव उनाडकट हा चांगला गोलंदाज आहे. गायकवाडला आज त्याच्याशी संघर्ष करावा लागणार आहे. आतापर्यंत गायकवाडे चार मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्याने 552 धावा केल्या आहेत.