T20 World Cup : टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये रोहितबरोबर ओपनिंग करणार का?, विराटचं बेधडक उत्तर

आगामी टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माबरोबर ओपनिंग बॅटिंग करणार का?, या प्रश्नावर कर्णधार विराट कोहलीने बेधडक उत्तर दिलं. Will Virat Kohli open with Rohit in T20 World Cup? 

T20 World Cup : टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये रोहितबरोबर ओपनिंग करणार का?, विराटचं बेधडक उत्तर
Rohit Sharma And Virat kohli
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 8:54 AM

पुणे : आगामी टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये (T 20 World Cup) रोहित शर्माबरोबर (Rohit Sharma) ओपनिंग बॅटिंग करणार का?, या प्रश्नावर कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) बेधडक उत्तर दिलं. आम्हाला एकमेकांच्या साथीने बॅटिंग करायला आवडत, असं उत्तर विराट कोहलीने दिलं. मात्र टी ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये ओपनिंग करणार का?, यावर मात्र ‘आताच गॅरंटी देऊ शकत नाही’, असं तो म्हणाला. (Will Virat Kohli open with Rohit in T20 World Cup? )

इंग्लंडविरोधात पाचव्या आणि अंतिम टी ट्वेन्टी सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माने ओपनिंग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, जो निर्णय हिट साबित झाला. रोहित शर्माने सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आक्रमक बॅटिंग केली तर विराट कोहलीने सिंगल-डबल धावा काढून त्याला स्ट्राईक दिली.

काय म्हणाला विराट?

रोहित विराटचा ओपनिंग फॉर्म्युला यशस्वी झाल्यानंतर क्रिकेट विश्वात याच ओपनिंग जोडीची चर्चा सुरु आहे. किंबहुना याच जोडीने आगामी टी ट्वेन्टी विश्वचषकात ओपनिंग बॅटिंग करावी, अशी मतं काही एक्सपर्ट मांडत आहे. याच चर्चांवर उत्तर देताना विराटने तसा काही सध्या प्लॅन नाही. पण रोहित आणि मला एकत्र बॅटिंग करायला आवडतं. आपल्या पार्टनरशीप करायला आवडतात. तसंच आम्ही एकत्र खेळल्यानंतर रिझल्टही दिसतात, असं विराट म्हणाला.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या सामन्यात ओपनिंग बॅटिंग फॉर्म्युला पुढेही सुरु राहिल, असं सध्या तरी सांगू शकत नाही. मंगळवारपासून पाहुण्या इंग्लंडविरोधात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या सामन्यांत मात्र रोहित आणि शिखर डावाला सुरुवात करतील, असं विराट म्हणाला.

रोहित आणि शिखर डावाची सुरुवात करणार

‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि ‘गब्बर’ शिखर धवन (Shikhar Dhawan) ही जोडी या मालिकेत सलामी करणार आहेत. याबाबतची माहिती विराटने दिली. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विराट बोलत होता.

सूर्या खेळणार का? विराट म्हणतो…

मुंबईकर सूर्यकुमार यादवने टी 20 मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याला या कामिगरीच्या जोरावर एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं. सूर्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची की नाही,याबाबत आम्ही ठरवू”, असं विराटने नमूद केलं.

(Will Virat Kohli open with Rohit in T20 World Cup?)

हे ही वाचा :

India vs England, 1st Odi | पहिल्या सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीची मोठी घोषणा,रोहित-शिखर सलामीला येणार

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.