6 उत्तुंग षटकार खेचल्याने Prithvi Shaw पुन्हा चर्चेत
काल पृथ्वी शॉने जलदगतीने षटकार खेचले, 61 चेंडूत 134 धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया (Australia) आणि आफ्रिका (SA) आणि T20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत संधी न मिळाल्याने निराश झालेल्या पृथ्वी शॉने आज शतकी पारी खेळली. कालच्या शतकीपारी खेळीमध्ये पृथ्वी शॉचे 9 उत्तुंग षटकार खेचले त्यामुळे त्याची अधिक चर्चा सोशल मीडियावर आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आत्तापर्यंत टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनाी अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. पण कालची शॉची खेळी सगळ्यांच्या लक्षात राहिल अशी आहे.
काल पृथ्वी शॉने जलदगतीने षटकार खेचले, 61 चेंडूत 134 धावा केल्या. मुंबईच्या टीमच्या 230 एवढी मोठी धावसंख्या उभारली होती. पण आरामच्या टीम 169 धावापर्यंत मजल मारली.
Maiden hundred for Captain Prithvi Shaw in T20 format, hundred from 46 balls including 10 fours and 6 sixes, A knock to remember, What a player. pic.twitter.com/bokhoHDAPQ
— Johns. (@CricCrazyJohns) October 14, 2022
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पृथ्वी शॉने या आगोदर सुध्दा चांगली खेळी केली आहे. त्यामुळे त्याच्याकडून अशी खेळी होईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. कालच्या खेळीनंतर त्याची सगळीकडे चर्चा सुरु झाली.
उद्यापासून ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे त्याची रंगत उद्यापासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. 23 ऑक्टोबरला टीम इंडियाची पाकिस्तान बरोबर पहिली मॅच होणार आहे.