WITT: क्रीडाक्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा ‘व्हॉट इंडिया थिंक टुडे’ कार्यक्रमात सन्मान
देशात क्रीडाक्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या खेळाडूंनी आपली वेगळी ओळख तयार केली आहे. या खेळाडूंच्या कार्याची टीव्ही 9 नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक टुडे' कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
मुंबई : भारतात क्रिडा क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची कायमच चर्चा होत असते. सामाजिक जीवनात त्यांचा अलौकिक कार्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातं. आपल्या असाधारण कामगिरीने कोट्यवधी भारतीयांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात. नवोदित खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून प्रेरणा मिळते आणि काही तरी करण्यात आत्मविश्वास जागा होतो. क्रीडाक्षेत्रात अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा देशातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्क टीव्ही 9 ने सन्मान केला. विशेष कार्यक्रम ‘व्हॉट इंडिया थिंक टुडे’ कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरव केला. भारताचा महान बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद याच्या हस्ते युवा बॅडमिंटनपटू अनमोल खरब आणि पॅरा क्रिकेटपटू आमिर हुसैन लोन यांना नक्षत्र पुरस्कार देऊन सन्मान केला. टीव्ही 9 नेटवर्कच्या या कार्यक्रमाचं दुसरं पर्व रविवारी 25 फेब्रुवारी रोजी दिल्लीत पार पडलं. तीन दिवसीय या कार्यक्रमात पहिल्या दिवशी क्रीडाविश्वावर चर्चा झाली. यात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी मार्गदर्शन केलं. अनुराग ठाकुर यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचं यश आणि यजमानपदाबाबद दिलखुलासपणे सांगितलं. तर पुलेला गोपिचंद, लतिका खनेजा , पीयर नॉबेर यांनी इतर खेळातही संधी असल्याचं सांगितलं.
टीव्ही 9 नेटवर्कतर्फे खेळाडूंना नक्षत्र पुरस्कार देण्यात आला. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी बॅडमिंटनच्या विश्वात आपला ठसा उमटवणारा युवा खेळाडू अनमोल खरब याला पुलेला गोपीचंद यांच्या हस्ते नक्षत्र सन्मान प्रदान करण्यात आला. अनमोल खरबने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धा जिंकली, तर 2022 मध्ये आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरली. मलेशियामध्ये बॅडमिंटन आशियाई सांघिक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाची ती सदस्य होती. या स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले होते.
अनमोल व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरचा पॅरा क्रिकेटर आमिर हुसैन लोन यालाही पुलेला गोपीचंद यांच्या हस्ते नक्षत्र सन्मान देण्यात आला. वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी आपले दोन्ही हात गमावलेल्या आमिरला क्रिकेटची आवड आवड होती. मात्र दोन्ही हात गमवले असतानाही बॅट गळ्यात अडकवून दमदार शॉट्स खेळत आपली खास ओळख निर्माण केली. जम्मू-काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आणि लाखो तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहे.