IND W vs AUS W: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी महिला क्रिकेट टीमची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी
महिला टीम इंडियाच्या मॅच फक्त दोन मैदानात होणार आहेत.
मुंबई : महिला टीम इंडियाची (Woman team india) ऑस्ट्रेलियात (AUS) होणाऱ्या t20 मालिकेसाठी निवड समितीने खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियात टीम इंडियाच्या t20 मालिकेत पाच मॅच होणार आहेत. महिला टीमचं नेतृत्व हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हीच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे तिच्या नेतृत्वात महिला टीम कशी कामगिरी करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. पूजा वस्त्राकार ही जखमी झाल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. तिच्या जागेवर कोणाला संधी मिळणार याबाबत अद्याप निवडी समितीने काहीही जाहीर केलेलं नाही.
महिला टीम इंडियाच्या मॅच फक्त दोन मैदानात होणार आहेत. पहिल्या दोन मॅच डी. वाई पाटील मैदानात होतील. तर उरलेले तीन सामने ब्रेबॉर्न मैदानात होणार आहे.
संपुर्ण मालिकेचं वेळापत्रक
9 डिसेंबर 1st T20I – डी. वाई पाटील मैदानात
11 डिसेंबर 2st T20I – डी. वाई पाटील मैदानात
14 डिसेंबर 3st T20I – ब्रेबॉर्न मैदानात
17 डिसेंबर 4st T20I – ब्रेबॉर्न मैदानात
20 डिसेंबर 5st T20I – ब्रेबॉर्न मैदानात
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवानी, देविका वायदा, अंजली सरवानी. एस मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल.