शारजा : वूमन्स टी 20 चॅलेंज स्पर्धेच्या ( Womens T20 Challenge 2020) अंतिम सामन्यात ट्रेलब्लेझर्सने (Trailblazers) सुपरनोावजवर (Supernovas)16 धावांनी विजय मिळवला आहे. यासह ट्रेलब्लेझर्सने पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरलं आहे. ट्रेलब्लेझर्सने सुपरनोावजला विजयासाठी 119 धावांचे आव्हान दिले होते. मात्र सुपरनोावजला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 102 धावाच करता आल्या. सूपरनोवाजकडून कर्णधार स्मृती मंधानाने सर्वाधिक 30 धावा केल्या. तर शशिकला श्रीवर्धनेने 19 धावा केल्या. ट्रेलब्लेझर्सकडून सलमा खातूनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दिप्ती शर्माने 2 विकेट्स घेत सलमाला चांगली साथ दिली. तसेच सोफी इक्लेस्टोनने 1 विकेट घेतली. womens t20 challenge 2020 final trailblazers beat Supernovas by 16 runs
#Trailblazers WIN the #JioWomensT20Challenge pic.twitter.com/LXJClXZcn3
— IndianPremierLeague (@IPL) November 9, 2020
विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या सुपरनोवजने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. एकाही जोडीला चांगली भागीदारी करण्यास यश आले नाही. सुपरनोावजला पहिला धक्का चमारी अट्टापट्टूच्या रुपात लागला. चमारी 8 धावांवर बाद झाली. यानंतर तानिया भाटीया 14 धावांवर माघारी परतली. जेमीमह रॉड्रिग्सला दिप्ती शर्माने बाहेरचा रस्ता दाखवला. जेमीमहने 13 धावा केल्या. शशिकला श्रीर्वर्धनेनला चांगली सुरुवात मिळाली. मात्र तिला या खेळीचे मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही. शशिकला 19 धावा करुन तंबूत परतली.
CHAMPIONS!!#Trailblazers #JioWomensT20Challenge pic.twitter.com/mR4yGwSsHQ
— IndianPremierLeague (@IPL) November 9, 2020
अनुजा पाटील चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात 8 धावांवर रन आऊट झाली. कर्णधार हरमप्रीत कौर 30 धावांवर खेळत होती. मात्र निर्णायक क्षणी सलमा खातूनने हरमनप्रीतला बाद केल. यानंतर याच 19 व्या ओव्हरमध्ये सलामाने पूजा वस्त्राकरला शून्यावर बाद केलं. ट्रेलब्लेझर्सकडून सलमा खातूनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दिप्ती शर्माने 2 विकेट्स घेत सलमाला चांगली साथ दिली. तर
त्याआधी सुपरनोवाजने टॉस जिंकून ट्रेलब्लेझर्सला बॅटिंगसाठी भाग पाडले. बॅटिंगसाठी आलेल्या ट्रेलब्लेझर्सची चांगली सुरुवात झाली. कर्णधार स्मृती मंधाना आणि डिंड्रा डॉटीन या सलामी जोडीने संघासाठी 71 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी तोडायला पूनम यादवला यश आले. पूनमने डिंड्राला 20 धावांवर बाद केलं. यानंतर रिचा घोष मैदानात आली. स्मृतीने रिचाच्या साह्याने धावफळक धावता ठेवला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 3० धावा जोडल्या. या भागीदारीदरम्यान स्मृतीने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र ट्रेलब्लेझर्सचा 101 स्कोअर असताना स्मृती 68 धावांवर बाद झाली. स्मृतीने 49 चेंडूत 5 फोर आणि 3 सिक्ससह 68 धावांची खेळी केली.
यानंतर ट्रेलब्लेझर्सचा डाव गडगडला. सुपरनोवाजच्या राधा यादवने गोलंदाजीसमोर ट्रेलब्लेझर्सच्या एकाही फलंदाजाला मैदानात टिकता आले नाही. ट्रेलब्लेझर्सने एकामागे एक विकेट गमावली. त्यामुळे ट्रेलब्लेझर्सची 101-2 वरुन 20 ओव्हरमध्ये 118-8 अशी परिस्थिती झाली. राधा यादवने 16 धावा देत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर पूनम यादवने 1 विकेट घेतला.
ट्रेलब्लेझर्स : स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पुनम राऊत, रिचा घोष, डी. हेमलथा, नुझत परविन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी इक्लेस्टोन, नाथकं चाणथम, डीन्ड्रा डॉटिन, काश्वी गौतम
सुपरनोवाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमीमह रॉड्रिग्स (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला श्रीवर्धने, पूनम यादव, शकेरा सेलमॅन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, आयाबोंगा खाका, मुस्कान मलिक
संबंधित बातम्या :
womens t20 challenge 2020 final trailblazers beat Supernovas by 16 runs