Women’s T20 Challenge, Trailblazers vs Supernovas : अटीतटीच्या सामन्यात सुपरनोवाजची ट्रेलब्लेझर्सवर 2 धावांनी मात, फायनलमध्ये धडक

सुपरनोवाजकडून चमारी अट्टापट्टूने 48 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 67 धावांची खेळी केली.

Women’s T20 Challenge, Trailblazers vs Supernovas : अटीतटीच्या सामन्यात सुपरनोवाजची ट्रेलब्लेझर्सवर 2 धावांनी मात, फायनलमध्ये धडक
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 11:31 PM

शारजा : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात सुपरनोवाजने (Supernovas) ट्रेलब्लेझर्सवर (Trailblazers) 2 धावांनी मात केली आहे. या विजयासह सुपरनोवाजने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. सुपरनोवाजने ट्रेलब्लेझर्सला विजयासाठी 147 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ट्रेलब्लेझर्सला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 144 धावाच करता आल्या. ट्रेलब्लेझर्सकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक नाबाद 43 धावा केल्या. तर कर्णधार स्मृती मंधानाने 33 धावांची खेळी केली. तसेच डीन्ड्रा डॉटिन आणि हर्लिन देओल या दोघींनी प्रत्येकी 27 धावा केल्या. सुपरनोवाजकडून राधा यादव आणि शकेरा सेलमॅन या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर अनुजा पाटीलने 1 विकेट घेतली. womens t20 challenge 2020 supernovas beat trailblazers by 2 runs

त्याआधी सुपरनोवाजने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सुपरनोवाजने 20 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावून 146 धावा केल्या. सुपरनोवाजकडून चमारी अट्टापट्टूने सर्वाधिक धावा केल्या. चमारीने 48 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 67 धावांची खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 31 धावा केल्या. तसेच प्रिया पुनियाने 30 रन्स केल्या. ट्रेलब्लेझर्स कडून सलमा खातून, हर्लिन देओल आणि झुल गौस्वामीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

दरम्यान 10 नोव्हेंबरला ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज यांच्यात अंतिम सामना खेळण्यात येणार आहे. हा अंतिम सामना शारजा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या फायनल मॅचला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

सुपरनोवाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमीमह रॉड्रिग्स (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला श्रीवर्धने, पूनम यादव, शकेरा सेलमॅन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, आयाबोंगा खाका, मुस्कान मलिक

ट्रेलब्लेझर्स : स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पुनम राऊत, रिचा घोष, डी. हेमलथा, नुझत परविन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी इक्लेस्टोन, नाथकं चाणथम, डीन्ड्रा डॉटिन, काश्वी गौतम

संबंधित बातम्या :

IPL 2020 | बीसीसीआयकडून प्ले-ऑफचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ ठिकाणी होणार अंतिम सामना

IPL 2020, Qualifier 2 : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो, Qualifier 2 सामन्यात डच्चू मिळण्याची शक्यता

womens t20 challenge 2020 supernovas beat trailblazers by 2 runs

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.