World Cup 2019 : ‘मेन इन ब्लू’ आता भगव्या रंगात?
येत्या 22 जूनला भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यात भारत निळ्याएवजी भगव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
लंडन : इंग्लंडमध्ये सध्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करत अपराजीत ठरला आहे. भारताने आतापर्यंत चार सानमे खेळले आहेत. त्यापैकी तीन जिंकले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर आता येत्या 22 जूनला भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यात भारत निळ्याएवजी भगव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
ज्याप्रकारे विराटची टीम इंडिया खेळते आहे, ते बघून तो प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार नाही हे तर नक्की. मात्र, अफगाणिस्तानसोबतच्या सामन्यात भारतीय संघात एक बदल होऊ शकतो. यावेळी भारताचे ‘मेन इन ब्लू’ निळ्या नाही तर भगव्या रंगात दिसू शकतात. याचं कारण म्हणजे अफगाणिस्तानच्या जर्सीचा रंगही निळा आहे.
यंदाच्या विश्वचषकात 10 पैकी चार संघांच्या जर्सीचा रंग निळा आहे. भारत, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या संघांच्या जर्सीचा रंग हा निळा आहे. अफगाणिस्तानच्या जर्सीचा रंग निळा असल्याने भारत 22 जूनला मैदानात भगव्या रंगाच्या जर्सीत उतरु शकतो. ही जर्सी मागील बाजूने भगव्या रंगाची असेल.
मेन इन ब्लूच्या नावाने जगभर प्रसिद्ध असणाऱ्या भारतीय संघाने आजवर कधीही निळ्या रंगाचा त्याग केलेला नाही. पण, यंदाच्या विश्वचषकात चार संघांच्या जर्सी या निळ्या रंगाच्या असल्याने भारताला जर्सीच्या रंगात बदल करावा लागत आहे. निळ्या रंगानंतर हिरव्या रंगाच्या जर्सीत पाकिस्तान, बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका हे तीन देश खेळतात. तर न्यूझीलंडची जर्सी काळ्या रंगाची, ऑस्ट्रेलियाची पिवळ्या रंगाची आणि वेस्ट इंडीजची मरुन रंगाची आहे.
संबंधित बातम्या :
World Cup 2019 : ICC ने विचारलं, कुणाचा सिक्सर चांगला, सचिन म्हणाला आमची मुंबई!
World Cup 2019 : शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर, ऋषभ पंत भारतीय संघात
IndvsPak : बाबरची दांडी उडवणाऱ्या कुलदीपवर विराट फिदा, मॅचनंतर म्हणाला…