World Cup 2023 Points Table : दक्षिण अफ्रिकेचा भारताला दे धक्का, समान गुण असूनही हिरावून घेतलं पहिलं स्थान

World Cup 2023 Points Table :वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेची जबरदस्त कामगिरी राहिली आहे. न्यूझीलंडला पराभूत करत दक्षिण अफ्रिकेने अव्वल स्थान गाठलं आहे. तर पाकिस्तानला आशा अजून पल्लवित झाल्या आहेत.

World Cup 2023 Points Table : दक्षिण अफ्रिकेचा भारताला दे धक्का, समान गुण असूनही हिरावून घेतलं पहिलं स्थान
World Cup 2023 Points Table : दक्षिण अफ्रिकेने भारताला टाकलं मागे, नेट रनरेटचा बसला मोठा फटका Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 10:22 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सातवा टप्पा सुरु आहे. सातव्या टप्प्यात दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सामना पार पडला. हा सामना दक्षिण अफ्रिकेने 190 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे गुणतालिकेवर जबरदस्त प्रभाव पडला आहे. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत दक्षिण अफ्रिकेला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. पण हा निर्णय चुकीचा ठरला असंच म्हणावं लागेल. दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढलं. रस्सी व्हॅन दर डुसेन आणि क्विंटन डी कॉक यांनी शतकी खेळी केल्या. रस्सीने 118 चेंडूत 133 धावा, तर क्विंटनने 116 चेंडूत 114 धावा केल्या. त्याचबरोबर डेविड मिलरने 30 चेंडूत 53 धावा केल्या. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 358 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण न्यूझीलंडचा संघ सर्वबाद 167 धावा करू शकला. त्यामुळे न्यूझीलंडचा नेट रनरेटमध्ये मोठा फरक पडला आहे. पाचव्या टप्प्यात पहिल्या स्थानावर असलेला न्यूझीलंडचा संघ आता चौथ्या स्थानावर गेला आहे. टॉप 4 मध्ये स्थान टिकवणं आता मोठं आव्हान आहे. तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या आशा वाढल्या आहेत.

दक्षिण अफ्रिकेने 12 गुण आणि +2.290 नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं आहे. तर भारत 12 गुण आमइ +1.405 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 8 गुणांसह तिसऱ्या आणि न्यूझीलंड 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड पराभूत झाल्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला उपांत्य फेरीची संधी वाढली आहे. न्यूझीलंडने आणखी एक सामना गमवला तर पाकिस्तानला संधी मिळू शकते. पण नेट रनरेटही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.

संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका 7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504

बांगलादेश आणि इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर नेदरलँड आणि श्रीलंकेच्या आशा जर तर वर अवलंबून आहेत. पाकिस्तानचंही तसंच भगवान भरोसे आहे. या तिन्ही संघांचा एक पराभव होताच स्पर्धेती आव्हान संपुष्टात येणार आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने उर्वरित सामन्यात पराभवाची धूळ चाखली, तर मात्र संधी मिळू शकते. त्यामुळे अजूनही उम्मीद पे दुनिया कायम है असं म्हणायला हरकत नाही.

भारताचा सातवा सामना श्रीलंकेशी 2 नोव्हेंबरला होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांचं हे होम पिच आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच आशा आहेत. टीम इंडियाचं तसं पाहिलं तर उपांत्य फेरीत निश्चित झालं आहे. पण उद्या त्यावर शिक्कामोर्तब होईल.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.