T20 World Cup 2022 : ‘वर्ल्ड कप महत्त्वाचा आहे, पण…’,जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीबद्दल रोहित शर्माने मन जिंकणार वक्तव्य
टीम इंडियाचे फलंदाज सध्या अधिक लयमध्ये दिसत आहेत.
उद्यापासून टी 20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेला सुरुवात होत आहे. टीम इंडियाची (Team India) पहिली मॅच पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध 23 ऑक्टोबरला होणार आहे. त्याची चर्चा आत्तापासून सोशल मीडियावर सुरु आहे. तसेच जसप्रीत बुमराह पाठ दुखीच्या दुखण्यामुळे टीम इंडियातून बाहेर गेला आहे. त्याची जागा आता मोहम्मद शमीने घेतली आहे. दोन्ही गोलंदाजांनी अनेक सामने जिंकून दिले आहेत.
टीम इंडियाचे फलंदाज सध्या अधिक लयमध्ये दिसत आहेत. हार्दीक पांड्या, विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांनी ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे.
एखादा खेळाडू जखमी होणे हा खेळाचा एक भाग आहे. मागच्या इतक्या दिवसांपासून बुमराह क्रिकेट खेळतोय, मग जखमी होणार नाही का ? तसेच मोहम्मद शमी हा इतक्या दिवसांपासून घरी तंदुरुस्त होता. पण शमी अचानक कोरोनाचं निदान झालं. त्यामुळे पुन्हा त्याने आराम केला. आता तो आमच्यासोबत आहे. त्याने चार सेशनमध्ये चांगली गोलंदाजी सुद्धा केली आहे.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.