मोदींचं स्वप्न शाहांकडून पूर्ण, गुजरातमध्ये जगातील सर्वात भव्य स्टेडियम

गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी मोटेरामध्ये जगातील सर्वात मोठं क्रीडा मैदान तयार करण्याचं पाहिलेलं स्वप्न आता अमित शाह यांनी पूर्ण केलं आहे

मोदींचं स्वप्न शाहांकडून पूर्ण, गुजरातमध्ये जगातील सर्वात भव्य स्टेडियम
Follow us
| Updated on: Aug 27, 2019 | 1:34 PM

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पाहिलेलं एक स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सरसारवले आहेत. गुजरातमध्ये (Gujarat) जगातील सर्वात मोठं स्टेडियम (World’s Largest Cricket Stadium) तयार करण्यात आलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना, तत्कालीन गुजरात क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी मोटेरामध्ये जगातील सर्वात मोठं क्रीडा मैदान तयार करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

अहमदाबाद (Ahmedabad) शहरामधील मोटेरा भागात 63 एकरवर बांधण्यात आलेल्या या मैदानाला 700 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या स्टेडियममध्ये एकाचवेळी 1 लाख 10 हजार प्रेक्षक क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. या मैदानाचं नामकरण ‘सरदार पटेल गुजरात स्टेडियम’ (Sardar Patel Gujarat Stadium) असं करण्यात येणार आहे.

याआधीही या मैदावर सामने खेळवण्यात आले आहेत. मात्र या मैदानाला आता अतिभव्य स्वरुप देण्यात आलं आहे.

गृहमंत्री आणि आता जीसीएच्या अध्यक्षपदी असलेल्या अमित शाह यांनी मोदींचं स्वप्न पूर्णत्वास नेलं. या मैदानाचं भूमिपूजन जानेवारी 2016 मध्ये करण्यात आलं होतं. येत्या डिसेंबरपर्यंत मैदानाचं काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये इथे आंतरराष्ट्रीय सामने भरवण्याचा शाहांचा मानस आहे.

वैशिष्ट्यं काय?

-मैदानात तीन प्रॅक्टिस ग्राऊंड, क्लब हाऊस, ऑलिम्पिक सामन्यांसाठी आवश्यक आकाराचे स्विमिंग पूल आणि एक इनडोअर क्रिकेट अकॅडमी

-जेव्हा एखादा क्रिकेटपटू चौकार किंवा षटकार ठोकेल, तेव्हा स्टेडियममधील प्रत्येकाला हा क्षण पाहता येईल, असं मैदानाचं

-कार आणि दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था. एकाचवेळी 4 हजार कार आणि 10 हजार बाईकचं पार्किंग करता येणार.

-75 कॉर्पोरेट बॉक्स तयार करण्यात आले आहेत

-क्रिकेटच्या मैदानावर पहिल्यांदाच एलईडी दिवे लावण्यात येणार.

-स्टेडियमजवळच मेट्रोलाईनचीही व्यवस्था

-प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग

जुन्या मैदानात रचलेले विक्रम

-सुनील गावस्करने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात आधी 10 हजार धावा पूर्ण केल्या

-कपिल देवने न्यूझीलंडच्या रिचर्ड हेडलीचा सर्वाधिक कसोटी विकेटचा विक्रम मोडला

-सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीतील पहिलं द्विशतक

-2011 मध्ये विश्वचषकात भारताने याच मैदानात ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला होता.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.