Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने मारलेला खतरूड सिक्सचा व्हिडीओ व्हायरल
सुर्यकुमार यादवचे कालचे शॉट एकदम जबरदस्त पाहायला मिळाले.
काल झालेल्या ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाच्या (India) फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीचं धुलाई केल्याचं पाहायला मिळालं. मोठी धावसंख्या उभी करायची असं टीमचं धोरण असल्याने काल सगळ्यांनी चांगली फलंदाजी केली. पण विराट कोहलीला (Virat Kohli) काल सुद्धा अपयश आलं.
Ridiculous sixes by Suryakumar Yadav. pic.twitter.com/h8RBQd3f9w
हे सुद्धा वाचा— Johns. (@CricCrazyJohns) September 20, 2022
केएल राहूलने सुरुवातीला फलंदाजी करीत असताना पहिल्या ओव्हरपासून अधिक धावा कशा होतील याकडे लक्ष दिलं. त्यानंतर सुर्य़कुमार यादवने आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये पाहूण्यांचा समाचार घेतला.
विशेष म्हणजे हार्दीक पांड्याने कालच्या सामन्यात 30 चेंडूत 71 धावा केल्या. काल पांड्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले. काल सगळ्यांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे टीम इंडियाच्या 208 धावा झाल्या.
सुर्यकुमार यादवचे कालचे शॉट एकदम जबरदस्त पाहायला मिळाले. यापुर्वी सुर्यकुमार यादवचे असे शॉट आयपीएलमध्ये पाहायला मिळाले होते. काल सुर्यकुमार यादवने खेचलेला एक षटकार तुफान व्हायरल झाला आहे.
अक्षर पटेल हा गोलंदाज सोडला तर, सगळ्या गोलंदाजांची काल ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी धुलाई केली. दुसऱ्या इनिंगमधल्या 17 व्या षटकापर्यंत टीम इंडिया सामना जिंकेल अशी स्थिती होती.