WPL 2023 अंतिम फेरीपूर्वी दिल्ली आणि मुंबईच्या कर्णधारांनी स्पष्टच सांगितलं, फायनल सामना…

वुमन्स प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

WPL 2023 अंतिम फेरीपूर्वी दिल्ली आणि मुंबईच्या कर्णधारांनी स्पष्टच सांगितलं, फायनल सामना...
WPL 2023 अंतिम फेरीपूर्वी दिल्ली आणि मुंबईच्या कर्णधारांनी स्पष्टच सांगितलं, फायनल सामना...Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 9:28 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामना रंगणार आहे. दोन्ही संघानी साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे अंतिम फेरीचा सामना तुल्यबळ संघात होणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार? कोणाचं पारडं जड? याबाबत भाकीत वर्तवणं क्रीडाप्रेमींना देखील कठीण जात आहे. अंतिम फेरीपूर्वी दोन्ही संघांचे कर्णधार पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी हायव्होल्टेज सामन्यासाठी काय स्ट्रॅटर्जी असेल? या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं.

“आम्हाला कल्पना आहे की त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे दिल्लीपुढे मोठं आव्हान आहे. पण असं असलं तरी आमचा आत्मविश्वास दांडगा आहे. आम्ही इथपर्यंत त्याच जोरावर पोहोचलो आहोत. त्यामुळे आमची चांगली तयारी झालेली आहे. पण अंतिम फेरीत चांगला सामना होईल. आम्ही आमचा चांगला खेळ खेळू.”, असं मेग लॅनिंगनं पत्रकार परिषदेत सांगितलं.

“मुंबई आणि दिल्ली संघांची स्पर्धेत चांगली कामगिरी राहिली आहे. त्यामुळे अंतिम फेरीत तुल्यबळ संघ लढणार आहेत. त्यामुळे पुढचा विचार करता खरंच चांगला संघ आहे. एलिमिनेटर फेरीत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.” असं दिल्ली कॅपिटल्स कर्णधार मेग लॅनिंगनं पुढे सांगितलं.

दुसरीकडे मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीनेही अंतिम फेरीच्या सामन्यात आपली भूमिका स्पष्ट केली. “त्याच्याकडे खूप चांगले खेळाडू आहेत. त्यांनी साखळी फेरीत चांगली कामगिरी केली आहे. इतकंच काय तर आम्हाला एकदा पराभवाची धुळ चारली आहे. आम्हाला माहिती आहे ते कसा खेळ करतील आम्ही त्यासाठी रणनिती तयार केली आहे.” साखळी फेरीत दिल्ली आणि मुंबई हे दोनदा आमनेसामने आले. दोघांनी एकमेकांना एकदा पराभूत केलं आहे. आता तिसऱ्यांदा कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

मुंबई इंडियन्स टीम | हरमनप्रीत कौर (कॅप्टन) नेट सीवर, एमिलिया कर, पूजा वस्‍त्राकर, यास्तिका भाटिया, हीथर ग्राहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, साईका इशाक, हेली मैथ्‍यूज, क्‍लोए ट्रायोन, हुमाएरा काजी, प्रियंका बाला, सोनम यादव, नीलम बिश्‍ट आणि जिंतामनी कलिटा.

दिल्ली कॅपिट्ल्स टीम | मेग लॅनिंग (कॅप्टन), जेमिमाह रोड्रिग्स (उपकर्णधार), शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिजॅन कप्प, तीतस साधु, एलिस कॅप्सी, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणि, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जोनासन, स्नेहा दीप्ती आणि अरुंधति रेड्डी.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.