WPL 2023, RCB vs MI: टेक्नोलॉजीचा दे धक्का! आठव्या षटकात हरमनप्रीत कौरसोबत काय झालं?
वुमन्स प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची ऋचा घोष बाद असल्याची अपील करण्यात आली. कॉट बिहाइंडसाठी पंचाकडे दाद मागितली. ऋषा घोष तंबूतही परतत होती, पण झालं असं की...
मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीग 2023 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स यांच्यात सामना रंगला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरुने 18.4 षटकात सर्वबाद 155 धावा केल्या आणि विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यातील आठव्या षटकात एक प्रकार पाहायला मिळाला. सुरुवातीला बंगळुरुचे झटपट विकेट गेल्याने ऋषा घोषनं डाव सावरला. पण आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कॉट बिहाइंड ही अपील करण्यात आली. ब्रंटच्या मिडल शॉर्ट चेंडूवर ऋचाने हुक मारण्याचा प्रयत्न केला पण उशिरा झाल्याने बॅटची एज लागली आणि चेंडू थेट विकेटकीपरच्या हातात गेला.
मुंबईच्या खेळाडूंनी आवाज ऐकताच पंचांकडे बादसाठी अपील केला. ऋचाने इतकी जोरदार अपील पाहून तंबूत परतण्याची तयारी केली. मात्र पंचांनी तिला नाबाद घोषित केलं. यामुळे मुंबईच्या खेळाडूंना धक्काच बसला. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हीनं क्षणाचाही विलंब न करता रिव्ह्यू घेतला. त्यानंतर पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली.
अल्ट्राएजमध्ये तर ऋचा बॅट चेंडूला लागलीच नाही असं दाखवलं. त्यामुळे पंचांनी दिला नाबाद घोषित केलं. पंचांच्या या निर्णयामुळे हरमनप्रीत कौर नाराज झाली. कारण स्लो मोशन रिप्लेमध्ये बॅटची एज लागल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्याचबरोबर ऋचाचा चेहराही सर्वकाही सांगत होता. मात्र अल्ट्राएज हा निर्णय देऊ शकला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
ऋचाने 26 चेंडूत 28 धावांची खेळी केली. यात 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. हिली मॅथ्यूच्या गोलंदाजीवर ती बाद झाली. नॅट क्विवर ब्रंटने तिचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. स्मृती आणि श्रेयांका या दोघींनी प्रत्येकी 23 धावांचं योगदान दिलं. कनिका आहुजा 22 रन्स करुन माघारी परतली. तर मेगन शूट हीने 20 धावा केल्या. सोफी डिवाइन हीने 16 तर एलिस पॅरीने 13 धावा जोडल्या. आरसीबीच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजांना हात खोलून दिले नाहीत.
दोन्ही संघाचे खेळाडू
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्लेइंग इलेव्हन | स्मृति मंधना (कॅप्टन), दिशा कसाट, एलिस पॅरी, सोफी डिवाइन, रिचा घोष, हेदर नाइट, श्रेयंका पाटिल, कनिका आहूजा, मेगन शूट, रेणुका सिंह आणि प्रीति बोस
मुंबई इंडियंस प्लेइंग इलेवन | हरमनप्रीत कौर (कर्णधार) यास्तिका भाटिया, हॅली मॅथ्यूज, नॅट ब्रंट, अमेलिया केर, हुमैरा काजी, पूजा वस्त्राकर, इजी वॉन्ग, कालिता आणि सायका.