MI vs GG Women: हरमनप्रीत कौरची वादळी खेळी, गुजरात जायन्ट्ससमोर 208 धावांचं आव्हान

मुंबई इंडियन्सनं गुजरात जायंट्ससमोर विजयासाठी 208 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात हरमनप्रीत कौरनं तुफान खेळी केली.

MI vs GG Women: हरमनप्रीत कौरची वादळी खेळी, गुजरात जायन्ट्ससमोर 208 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 9:50 PM

मुंबई : वुमन्स प्रिमियर लीग 2023 स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायन्ट्स या संघामध्ये सुरु आहे. पहिल्याच सामन्यात मुंबईने 20 षटकात 5 गडी गमवून 207 धावा केल्या आणि विजयासाठी 208 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर हीनं जबरदस्त खेळी केली. तिने 30 चेंडूत 65 धावा ठोकल्या. या खेळीत 14 चौकारांच्या समावेश आहे. तिच्या या खेळीच सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पहिल्याच सामन्यातील तिची आक्रमक खेळी पाहून उपस्थितांची मनं जिंकली आहे. आता गुजरात जायंट्स मुंबईनं दिलेलं आव्हान गाठतं की नाही याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

मुंबईचा डाव

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का यास्तिका भाटियाच्या रुपानं लागला. अवघी एक धाव करून ती तंबूत परतली. त्यानंतर हेले मॅथ्यु आणि नॅट क्विवर ब्रंट या जोडीने बाजी सावरली. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 50 धावांची भागीदारी केली. यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यास मदत होणार आहे.हिली मॅथ्यु 31 चेंडूत 47 धावा करून बाद झाली. तिला अॅशले गार्डनरनं त्रिफळाचीत केलं. तिने तीन चौकार आणि 4 षटकार ठोकले. तिच्या पाठोपाठ नॅट क्विवर ब्रंटही 18 चेंडूत 23 धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत एकूण 5 चौकार मारले.त्यानंतर चौथ्या विकेटसाठी हरमनप्रीत कौर आणि एमेला केर या जोडीनं 89 धावांची भागीदारी केली. हरमनप्रीतनं 89 तर एमेला नाबाद 45 धावांवर राहिली. पूजा वस्त्राकार 8 चेंडूत 15 धावा करून तंबूत परतली.

मुंबईचे पुढचे सामने

  • 6 मार्च MI vs RCB संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबोर्न स्टेडियम
  • 9 मार्च DC vs MI संध्याकाळी 7:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडियम
  • 12 मार्च UPW vs MI संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबोर्न स्टेडियम
  • 14 मार्च MI vs GG संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबोर्न स्टेडियम
  • 18 मार्च MI vs UPW दुपारी 3:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडियम
  • 21 मार्च RCB vs MI दुपारी 3:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडियम

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स महिला संघ – यास्तिका भाटिया, हेले मॅथ्यु, नॅट क्विवर ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकार, इसी वाँग, हुमैरा काझी, अमैला केर, अमनजोत कौर, जिंतीमनी कालिता, सायका इशाक

गुजरात जायंट्स महिला संघ – बेथ मूनी, सब्बीनेनी मेघना, हर्लीन देओल, अॅशले गार्डनर, अनाबेल सुथरलँड, दयालन हेमलथा, जॉर्जिया वारेहम, स्नेह राणा, तनुजा कनवार, मानसी जोशी, मोनिका पटेल

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.