“क्रिकेटमधील प्रत्येक चौकार, षटकार …”, WPL 2023 सुरु होताच सचिन तेंडुलकरचं ट्वीट चर्चेत

महिला क्रिकेट इतिहासात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. वुमन्स प्रिमियर लीगच्या माध्यमातून महिल क्रिकेटचा थरार आता क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे.

क्रिकेटमधील प्रत्येक चौकार, षटकार ..., WPL 2023 सुरु होताच सचिन तेंडुलकरचं ट्वीट चर्चेत
"क्रिकेटमधील प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेट ही..", WPL 2023 सुरु होताच सचिन तेंडुलकरचं ट्वीट चर्चेत Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 11:30 AM

मुंबई : वुमन्स प्रिमियर लीगला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायन्ट्स यांच्यात पहिला सामना सुरु आहे. तत्पूर्वी क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरचं ट्वीट चर्चे आलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ट्वीट करत महिला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर बीसीसीआयचं देखील अभिनंदन केलं आहे. ट्वीटच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता सचिन तेंडुलकरने अधोरेखित केली आहे. कोणत्याच क्षेत्रात महिला आता मागे नाहीत. सचिन तेंडुलकरचं हे ट्वीट आता वेगाने व्हायरल होत आहे. बीसीसीआयने या स्पर्धेचं आयोजन मुंबई आणि नवी मुंबईतल्या मैदानात केलं आहे. पाच टीम साखळी फेरीत एकमेकांशी दोनदा भिडणार आहे. म्हणजेच एक संघ अंतिम फेरीपूर्वी 8 सामने खेळणार आहे.

काय म्हटलं सचिन तेंडुलकरने

“वुमन्स प्रिमियर लीग सुरु झाली आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक चौकार सीमारेषेबाहेर जाईल. षटकार पार्कच्या बाहेर मारला जाईल आणि प्रत्येक विकेट ही क्रिकेटमधील लैंगिक समानतेचा विजय असेल. चला महिला क्रिकेटपटूंचं अभिनंदन करुयात. त्यांच्या खेळाचा आनंद लुटूया. ऑल द बेस्ट बीसीसीआय वुमन्स प्रिमियर लीगचं आयोजन केल्याबद्दल.”, असं ट्वीट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केलं आहे.

संघ, कर्णधार आणि त्याचे मालक

  • मुंबई इंडियन्स- हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिलायन्स
  • दिल्ली कॅपिटल्स -मेग लॅनिंग (कर्णधार) जेएसडब्ल्यू आणि जीएमआर ग्रुप
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- स्मृती मंधाना (कर्णधार), डियागो
  • गुजरात जायन्ट्स- बेथ मूनी (कर्णधार), अदाणी
  • युपी वॉरियर्स- अलिसा हिली (कर्णधार), काप्री ग्लोबल

पाच संघ आणि त्यांचे खेळाडू

मुंबई इंडियन्स टीम | हरमनप्रीत कौर (कॅप्टन) नेट सीवर, एमिलिया कर, पूजा वस्‍त्राकर, यास्तिका भाटिया, हीथर ग्राहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, साईका इशाक, हेली मैथ्‍यूज, क्‍लोए ट्रायोन, हुमाएरा काजी, प्रियंका बाला, सोनम यादव, नीलम बिश्‍ट आणि जिंतामनी कलिटा.

आरसीबी टीम | स्मृति मंधाना (कर्णधार), दिशा कसट, ऋचा घोष, इंदिरा रॉय, एलिस पेरी, सोफी डिवाइन, हेदर नाइट, एरिन बर्न्स, डाने वेन निकर्क, श्रेयंका पाटील, पूनम खेमनर, आशा शोबाना, कनिका अहूजा, रेणुका सिंह ठाकूर, प्रीति बोस, कोमल जैनजद, सहाना पवार आणि मेगन सुचित.

दिल्ली कॅपिट्ल्स टीम | मेग लॅनिंग (कॅप्टन), जेमिमाह रोड्रिग्स (उपकर्णधार), शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिजॅन कप्प, तीतस साधु, एलिस कॅप्सी, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणि, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जोनासन, स्नेहा दीप्ती आणि अरुंधति रेड्डी.

गुजरात जायंट्स टीम | बेथ मूनी (कॅप्टन), एश्ले गार्डनर,सोफिया डंकली, एनाबेल सदरलँड, हरलीन देओल, डिएंड्रा डॉटिन, स्नेह राणा, सब्बिनेनी मेघना, जॉर्जिया वारेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा, हर्ली गाला, अश्विनी कुमारी, परुनिका सिसोदिया आणि शबनम शकील.

यूपी वॉरियर्स टीम | एलिसा हीली (कर्णधार), दीप्ति शर्मा, सोफी एकलेस्टन, ताहिला मॅक्‍ग्रा, देविका वैद्य, शबनम इस्‍माइल, ग्रेस हॅरिस, अंजली शर्वनी, राजेश्‍वरी गायकवाड, श्‍वेता सहरावत, किरन नवगिरा, लॉरेन बेल, पार्शवी चोपडा, एस यशसरी, लक्ष्‍मी यादव आणि सिमरन शेख.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.