पुण्याचा पैलवान अभिजित कटके पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र केसरी’साठी मैदानात!
जालना : गजवितेजा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके पुन्हा एकदा मानाची गदा उचलण्यासाठी मैदानात दाखल झाला आहे. महाराष्ट्र केसरीसाठी त्याची लढत बुलडाण्याचा पैलवान बाळा रफिकसोबत होणार आहे. गादी गटातून सुवर्णपदक पटकावत पुण्याच्या अभिजित कटके याने अंतिम फेरीत धडक मारली. अभिजित कटके हा गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरीच्या विजेता असून सोलापूरच्या रवींद्र शेंडगे यांच्यासोबत त्याची गादी गटातील अंतिम सामन्याची […]
जालना : गजवितेजा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके पुन्हा एकदा मानाची गदा उचलण्यासाठी मैदानात दाखल झाला आहे. महाराष्ट्र केसरीसाठी त्याची लढत बुलडाण्याचा पैलवान बाळा रफिकसोबत होणार आहे. गादी गटातून सुवर्णपदक पटकावत पुण्याच्या अभिजित कटके याने अंतिम फेरीत धडक मारली. अभिजित कटके हा गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरीच्या विजेता असून सोलापूरच्या रवींद्र शेंडगे यांच्यासोबत त्याची गादी गटातील अंतिम सामन्याची लढत झाली.
अतिशय चुरशीच्या लढ्यात अभिजित कटके याने चितपट करून रवींद्र शेंडगे याच्यावर विजय मिळवला. तर बुलडाण्याचा बाळा रफिक याने माती गटातून सुवर्णपदक पटकावलं. बाळा रफिक याने रत्नागिरीच्या संतोष दोरवड याचा 5-0 ने पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. महाराष्ट्र केसरीची गदा रफिकच्या रुपाने विदर्भाकडे जाते, की अभिजित दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होतो, याकडे लक्ष लागलं आहे. वाचा – ‘महाराष्ट्र केसरी’तून एकाच तालमीतल्या तीन पैलवानांची माघार
काका पवारांच्या तालमीचा स्पर्धेवर बहिष्कार
माती विभागात उपांत्य फेरीत जालन्याच्या विलास डोईफोडे विरुद्ध पोपट घोडकेची झुंज होती. सकाळी याच कुस्तीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अन्याय झाल्याने पोपट तीन कुस्त्या जिंकूनही मैदानात हजर न झाल्याने जालन्याच्या विलास डोईफोडेला विजयी घोषित करण्यात आलंय. वाचा – काका पवारांच्या तालमीचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर बहिष्कार
जालन्यातील आझाद मैदानावर सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेवर गतवेळचा महाराष्ट्र केसरी काका पवार तालमीने बहिष्कार घातलाय. त्यामुळे काका पवार यांनी जालना शहर सोडलं असून ते पुण्याकडे रवाना झाले आहेत.
तिसऱ्या दिवसाचा संपूर्ण निकाल
61 किलो गादी (मॅट) विभाग
प्रथम- सौरभ पाटील (कोल्हापूर)
दृतीय-जयश सांगवी (कल्याण)
तृतीय-सागर बर्डे (नाशिक)
दृतीय-विजय पाटील (कोल्हापूर)
61 किलो माती विभाग
प्रथम- निखिल कदम (पुणे)
दृतीय-राहुल पाटील (सांगली)
तृतीय-अरुण खेगळे (पुणे)
70 किलो गादी (मॅट) विभाग
प्रथम- शुभम थोरात (पुणे)
दृतीय- स्वप्नील पाटील (कोल्हापूर)
तृतीय- धीरज वाघमोडे- सोलापूर
तृतीय- दिनेश मोकाशी (पुणे)
70 किलो माती विभाग
प्रथम- राम कांबळे (कोल्हापूर)
दृतीय- मच्छिंद्र निंगुरे (कोल्हापूर)
तृतीय-अरुण खेंगळे (पुणे)
86 किलो गादी (मॅट) विभाग
प्रथम- अक्षय कावरे (नगर)
दृतीय-अनिकेत खोपडे (पुणे)
तृतीय-भैरू नाते
दृतीय-विवेक (सांगली)
86 किलो माती विभाग
प्रथम- शशिकांत बोगर्डे (कोल्हापूर)
दृतीय-बालाजी यलगुंदे (जालना)
तृतीय- दत्ता नसळे (कोल्हापूर)
57 किलो (माती)
प्रथम-सागर मारकड (पुणे)
द्वितीय-संतोष हिरुगडे (कोल्हापूर)
तृतीय-ओंकार लाड(कोल्हापूर)
57 किलो (गादी)
प्रथम-जोतीबा अटकळे (सोलापुर)
द्वितीय-प्रदीप सूळ (सातारा)
तृतीय- सचिन पाटील(मुंबई)
79 किलो (गादी)
प्रथम- आशिष वावरे (सोलापूर)
द्वितीय- अक्षय चोरगे (पुणे)
तृतीय-अब्दुल शोएब(अमरावती)
तृतीय-केवळ भिंगार(नगर)
79 किलो (माती)
प्रथम- वेताळ शेंडगे (उस्मानाबाद)
द्वितीय- हनुमंत पुरी (सोलापूर)
तृतीय-अझर शेख(औरंगाबाद)