सागर धनखड हत्या : पैलवान सुशीलकुमारला मोठा झटका, रेल्वेतून हकालपट्टी, नोकरी गमावली!

उत्तर रेल्वेने सुशील कुमारला सेवेतून निलंबित केले आहे. त्यामुळे त्याच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. (Wrestler Sushil Kumar Suspended From Railway)

सागर धनखड हत्या : पैलवान सुशीलकुमारला मोठा झटका, रेल्वेतून हकालपट्टी, नोकरी गमावली!
कुस्तीपटू सुशील कुमार
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 11:29 AM

मुंबई : सागर धनखड हत्या प्रकरणात (Sagar Dhankhar merder Case) दिल्ली पोलिसांच्या कोठडीत असलेल्या पैलवान सुशील कुमारला (Sushil Kumar) मोठा झटका बसलाय. आता उत्तर रेल्वेने सुशील कुमारला सेवेतून निलंबित केले आहे. त्यामुळे त्याच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. 23 मे रोजी अटकेनंतर सुशील कुमारला रोहिणी कोर्टाने 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सागर धनखड हत्या प्रकरणात सुशील कुमारचा असलेला सक्रिय सहभाग पाहता उत्तर रेल्वेने त्याला सेवेतून निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. (Wrestler Sushil Kumar Suspended From Railway)

उत्तर रेल्वेचं मोठं पाऊल

सागरच्या खून प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केलेला कुस्तीपटू सुशील कुमार याला सेवेतून निलंबित केले जाईल, अशी घोषणा उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्याने केली. सोमवारी सांगितले की, ऑलिम्पिक पुरस्कार विजेता सुशील कुमार हा उत्तर रेल्वेचा वरिष्ठ वाणिज्यिक व्यवस्थापक आहे. 2015 पासून तो प्रतिनियुक्तीवर दिल्ली सरकारमध्ये आहे. त्याला शालेय स्तरावरील खेळाच्या विकासासाठी छत्रसाल स्टेडियमवर विशेष अधिकारी (OSD) म्हणून नियुक्त केले होते.

दिल्ली पोलिसांनी कोर्टात काय सांगितलं

सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी सागर धनखडला एखाद्या प्राण्याला मारावं तसं मारलं. सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांना त्या भागात आपली दहशत निर्माण करायची होती, असं कोर्टाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी सांगितलं. सुशील कुमार याच्याजवळ एका कुस्ती सर्किटमध्ये दहशत निर्माण करण्याच्या घटनेचा व्हिडिओ होता, असंही कोर्टाच्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनीही सांगितले.

पोलिसांनी खाक्या दाखवताच सुशील कुमारला रडू कोसळलं

कुस्तीच्या मैदानात आडदांड पैलवानांना लोळवत दोनदा ऑलिम्पिक पदक आणि कॉमनवेल्थमध्ये तिनदा सुवर्णपदक मिळवणारा हरियाणाचा कुस्तीपटूसुशील कुमार पोलिसी खाक्या दिसल्यावर अक्षरशः रडल्याचं पाहायला मिळालं. कुस्तीपटू सागर धनखर हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या फरार सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. त्यानंतर न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि इथूनच पोलिसांनी आपला खाक्या दाखवत तपासाची चक्रं वेगानं फिरवायला सुरुवात झालीय.

दिल्ली पोलिसांनी सुशील कुमार आणि त्याचा मित्र सहआरोपी अजय बक्करवाला यांना तीन ठिकाणी नेऊन चौकशी करण्यात आली. यात मॉडल टाऊन, शालीमार बाग आणि छत्रसाल स्टेडियम या ठिकाणांचा समावेश आहे.

“सुशील कुमारकडून छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या घटनेची कबुली”

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमारने छत्रसाल स्टेडियमवर झालेली घटना मान्य केलीय. मात्र, आपण केवळ दोन गटात झालेल्या वादात त्यांना वाचवत होतो, असा दावा सुशील कुमारने केला. याशिवाय सागर धनखर आणि सोनूला फ्लॅटवर आणण्याबाबत कबुली दिली नाही. गुन्हा करताना सुशील कुमारने वापरलेली गाडी आणि इतर पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकही घटनास्थळावर पोहचलं.

पीडित कुस्तीपटूला इतकं मारलं की पोलीस पोहचण्याआधीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कुमारने काही गँगस्टरसोबत छत्रसालच्या स्टेडियमच्या बेसमेंटला सागरला बेदम मारहाण केली. तसेच याचा व्हिडीओ देखील शूट केला. हा व्हिडीओ दाखवून आपल्या वाट्याला गेल्यावर आपण काय करतो हे दाखवत त्याला लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा त्यांचा हेतू होता. पीडित सागरला इतकी जबर मारहाण झाली की घटनास्थळावर पोलीस पोहचूपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे पोलिसांना सागरचा जबाब देखील घेता आला नाही. पीडित सागरच्या दोन मित्रांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय.

(Wrestler Sushil Kumar Suspended From Railway)

हे ही वाचा :

कुस्तीत दोनदा ऑलिम्पिक, आडदांड पैलवानांना लोळवलं; पण पोलिसांचा खाक्या बसताच सुशील कुमार रडला

हत्या प्रकरणात शिक्षा झाल्यास सुशील कुमारची ऑलिम्पिक पदकं काढली जाणार? वाचा सविस्तर

Sushil Kumar | फरार पैलवान सुशील कुमारला अखेर अटक, 18 दिवसांचा शोध संपला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.