Ind vs WI Women : वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यात विंडिजचं टीम इंडियाला इतक्या धावांचं आव्हान
भारत आणि वेस्ट इंडिजमधील सामन्यामध्ये दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स घेत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
केपटाऊन : भारत आणि वेस्ट इंडिजमधील सामना सुरू असून पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने भारताला 119 धावांचं लक्ष्य असणार आहे. माहिला कॅरेबिअन संघाच्या स्टैफनी टेलरने सर्वाधिक 42 धावा केल्या आहेत. भारताकडून दीप्ती शर्माने चार षटकांमध्ये 3 विकेट घेत विंडिजला बॅकफुटवर ढकललं. भारतीय संघाला आपल्या विजयारथाची घौडदौड कायम ठेवण्यासाठी 119 धावांचं असणार आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजची सुरूवात खराब झाली होती. सामन्याच्या दुसऱ्या षटकातच पुजा वस्त्राकरने कर्णधार हेले मैथ्यूजला बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या शेमेन कैंपबेलने आणि स्टैफनी टेलरने भागीदारी केली होती. 14 व्या ओव्हरमध्ये दीप्ती शर्माने जोडी फोडत संघाला यश मिळवून दिलं. दीप्तीने कैंपबेलने 30 धावांवर माघारी पाठवलं.
दुसरी विकेट गमावल्यानंतर वेस्ट इंडिजच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. दीप्ती शर्माने 3, पुजा वस्त्राकर आणि रेणुका सिंह यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. एकंदरित या सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली.
आजच्या सामन्यामध्ये संघाने दोन बदल केले होते. यामध्ये यास्तिका भाटिया आणि हरलीन देओलला बाहेर बसवण्यात आलं. स्मृती मंधानाने पुनरागमन केलं आहे. दुसरी खेळाडू देविका वैद्यला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आलं आहे.
स्मृती मंधाना पहिल्या सामन्यामध्ये बोटाच्या दुखापतीमुळे खेळू शकली नव्हती. पाकिस्तानविरूद्धचा सामना भारतीय संघाने 7 विकेट्सने जिंकला होता. दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तानचा वर्ल्ड कप मोहिमेतील पहिल्याच सामन्यात 7 विकेट्सने पराभव केला होता. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान टीम इंडियाने 1 ओव्हरआधी आणि 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं होतं.
भारत महिला (प्लेइंग इलेवन): स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कप्तान), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, देविका वैद्य, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकुर सिंह
वेस्टइंडीज महिला (प्लेइंग इलेवन): हेले मैथ्यूज (कप्तान), स्टैफनी टेलर, शेमेन कैंपबेल, शबिका गजनबी, चिनले हेनरी, चेडियन नेशन, अफी फ्लेचर, शामिलिया कॉनेल, रशादा विलियम्स (विकेटकीपर), करिश्मा रामहरैक, शकीरा सेलमैन