IND vs AUS : भारताकडे शेवटची संधी ! न्यूझीलँडविरुद्धच्या सामन्यात श्रीलंका मजबूत स्थितीत

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने आपली जागा निश्चित केली आहे. दुसऱ्या संघासाठी भारत आणि श्रीलंका या दोन संघात चुरस आहे. त्यामुळे कोण बाजी मारतं याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

IND vs AUS : भारताकडे शेवटची संधी ! न्यूझीलँडविरुद्धच्या सामन्यात श्रीलंका मजबूत स्थितीत
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतासाठी करो या मरोची स्थिती, श्रीलंकेनं पहिल्याच दिवशी केली कमालImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 2:08 PM

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील खेळपट्टी आणि ऑस्ट्रेलियाची स्थिती पाहता भारतासमोर विजयाचं मोठं आव्हान आहे. उस्मान ख्वाजानं तर भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं आहे. त्यात त्याला स्टीव्ह स्मिथची चांगली साथ लाभली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकला तर अंतिम फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. त्यामुळे भारताकडे ही शेवटची संधी आहे असंच म्हणावं लागेल. कारण दुसरीकडे न्यूझीलँड दौऱ्यावर असलेला श्रीलंकन संघ पहिल्याच दिवशी मजबूत स्थितीत आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुध्दचा चौथा कसोटी सामना जिंकला तर थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणार आहे. पण हा सामना गमावला किंवा ड्रॉ झाला तर न्यूझीलँड आणि श्रीलंका मालिकेवर अवलंबून राहावं लागेल.

भारताने चौथा सामना गमावला आणि श्रीलंकेनं न्यूझीलँड विरुद्धची मालिक 2-0 ने जिंकली तर थेट अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. पण एक सामना गमावला किंवा ड्रॉ झाला तर मात्र भारताला संधी मिळणार आहे.

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलँड पहिल्या दिवशीचा खेळ

न्यूझीलँडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना चांगली खेळी केली. दिवसखेर 6 गडी गमवून 305 धावांचा डोंगर रचला आहे. ओशाडा फर्नांडो अवघ्या 13 धावांवर बाद झाल्यानंतर डिमुथ करुणारत्ने आणि कुसल मेंडिस यांनी डाव सावरला. दुसऱ्या गड्यासाठी दोघांनी 137 धावांची भागीदारी केली.डिमुथने 50 धावा, तर कुसलने 87 धावांची खेळी केली.

डिमुथ आणि कुसल दोघंही एकापाठोपाठ एक असे बाद झाल्याने संघावर दडपण आलं होतं.मात्र अँजोलो मॅथ्युज आणि दिनेश चंदिमल यांनी डाव सावरला. चौथ्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी केली. दिनेश 39 धावांवर बाद झाल्यानंतर अँजोलो आणि धनंजया डिसिल्वाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर निरोशन डिकवेला अवघ्या 7 धावांवर एलबीडब्ल्यू झाला.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेच्या 6 बाद 305 धावा होत्या. दुसरीकडे न्यूझीलँडचे फलंदाज झटपट बाद झाले तर श्रीलंकेला पहिला कसोटी सामना जिंकण्याची संधी आहे.

दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

श्रीलंकेचा संघ | ओशाडा फर्नांडो, डिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, अँजोलो मॅथ्युस, दिनेश चंडिमाल, धनंजया डिसिल्वा, निरोशन डिकवेला, कसुन राजीथा, असिथा फर्नांडो, प्रबाथ जयसुरिया, लहिरू कुमारा

न्यूझीलँड संघ | टॉम लथाम, डेवोन कॉनवे, केन विलियमसन, हेन्री निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, मायकल ब्रेसवेल, टिम साउथी, मॅन हेन्री, नेल वॅगनर, ब्लेअर टिकनर

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.