WTC Final 2023 मधील पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक झटका!
Team India | टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात पहिल्यांदा एकूण दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत पराभूत झाली आहे. टीम इंडियाला या पराभवानंतर मोठा झटका लागला आहे.
मुंबई | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय क्रिकेट संघाला ऑलआऊट 234 धावाच करता आल्या. टीम इंडियाचं या पराभवासह सलग दुसऱ्यांदा टेस्ट वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अधुर राहिलं. तर ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये बाजी मारत वर्ल्ड रेकॉर्ड केला. ऑस्ट्रेलिया चॅम्पियन ट्रॉफी, टी 20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि टेस्ट वर्ल्ड कप अशा सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारी टीम ठरली. तर टीम इंडियाला या पराभवासह मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. टीम इंडियावर कसोटीतील अव्वल स्थान गमावण्याचा धोका आहे.
टीम इंडिया आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये 121 रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप फायनल जिंकल्याने रेटिंग पॉइंटमध्ये वाढ होणार आहे. आता जेव्हा आयसीसी टेस्ट रँकिंग अपडेट होईल तेव्हा टीम इंडियाच्या रेटिंग पॉइंट्समध्ये 2 ने घट झालेली असेल. यामुळे टीम इंडियाने रेटिंग्स पॉइंट्स 121 वरुन 119 इतके होतील. तर ऑस्ट्रेलियाचे रेटिंग पॉइंट्स 119 होईल. मात्र काही पॉइंट्सच्या फरकाने अव्वल स्थानी कोण हे लवकरच स्पष्ट होईल.
टीम इंडिया आता विंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया विंडिज विरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. तर या दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात प्रतिष्ठेची अॅशेस सीरिज होणार आहे. या मालिकेला 16 जूनपासून सुरुवात होतेय. एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. ऑस्ट्रेलियाने या पहिल्या 2 साम्यांपैकी एकही मॅच जिंकल्यास ऑस्ट्रेलिया नंबर 1 टीम ठरेल. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या अॅशेस सीरिजमधील कामगिरीकडे टीम इंडियाचं बारीक लक्ष असणार आहे.
दरम्यान टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत टीम इंडियाकडून युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. यामध्ये रिंकू सिंह आणि यशस्वी जयस्वाल या दोघांची नावं आघाडीवर आहेत.
टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याचं वेळापत्रक
कसोटी मालिका
पहिला सामना – 12 ते 16 जुलै
दुसरा सामना – 20-24 जुलै
वनडे सीरिज
पहिला सामना – 27 जुलै
दुसरा सामना 29 जुलै
तिसरा सामना 1 ऑगस्ट
टी 20 सीरिज
पहिला सामना – 4 ऑगस्ट
दुसरा सामना – 6 ऑगस्ट
तिसरा सामना – 8 ऑगस्ट
चौथ्या सामना – 12 ऑगस्ट
पाचवा सामना – 13 ऑगस्ट