WTC Final India Calculation : दुसऱ्या दिवशी न्यूझीलँड 5 बाद 162 धावा, श्रीलंकाकडे 193 धावांची आघाडी
बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित अवलंबून असणार आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी आता श्रीलंका आणि भारत या दोन्ही संघात चुरस वाढली आहे. तर ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे दुसऱ्या संघाचं जर तर वर सर्वकाही अवलंबून आहे. भारताला चौथा कसोटी सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. कारण मालिकेत 3-1 अशी स्थिती असल्यास थेट अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. पण सध्याची पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाची स्थिती पाहता सामना त्यांच्या पारड्यात झुकलेला दिसत आहे. भारताने तग धरून फलंदाजी केली तर हा सामना ड्रॉ होऊ शकतो. त्यामुळे अंतिम फेरीच्या श्रीलंकेच्या आशा वाढणार आहेत. दुसरीकडे, श्रीलंका न्यूझीलँड विरुद्धच्या पहिल्या डावात मजबूत स्थितीत आहे.
श्रीलंक विरुद्ध न्यूझीलँड या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला. दुसऱ्या दिवशी सामन्यावर श्रीलंकेनं मजबूत पकड मिळवल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हा सामना निर्णायक ठरेल असंच दिसत आहे. पहिल्या डावात श्रीलंकेनं सर्वबाद 355 धावा केल्या होत्या.न्यूझीलँडने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा 5 बाद 162 धावा केल्या आहेत. अजूनही श्रीलंकेकडे 193 धावांची आघाडी आहे. त्याचबरोबर आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढला आहे.
भारताने चौथा कसोटी सामना गमवला किंवा ड्रॉ झाला तर श्रीलंकेला एक संधी मिळणार आहे. श्रीलंकेनं न्यूझीलँड विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली की अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण एखादा सामना ड्रॉ किंवा पराभव स्वीकारावा लागल्यास भारताला संधी मिळेल. न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना 17 ते 21 मार्च दरम्यान आहे.
दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
श्रीलंकेचा संघ | ओशाडा फर्नांडो, डिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, अँजोलो मॅथ्युस, दिनेश चंडिमाल, धनंजया डिसिल्वा, निरोशन डिकवेला, कसुन राजीथा, असिथा फर्नांडो, प्रबाथ जयसुरिया, लहिरू कुमारा
न्यूझीलँड संघ | टॉम लथाम, डेवोन कॉनवे, केन विलियमसन, हेन्री निकोल्स, डेरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, मायकल ब्रेसवेल, टिम साउथी, मॅन हेन्री, नेल वॅगनर, ब्लेअर टिकनर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरीची तारीख
फायनल मॅचचं आयोजन हे 7 ते 11 जूनदरम्यान करण्यात आलं आहे. सामन्यात कोणत्याही कारणाने व्यत्यय आल्याने वेळ वाया जातो. आयसीसीने असं झाल्याने दोन्ही संघांचं नुकसान होऊ नये, यासाठी 1 राखीव दिवसही ठेवला आहे. जून 12 हा राखीव दिवस ठेवला आहे.