WWE रिंगमध्ये भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या Undertaker ला वाटायची भीती ! स्वत:च एका मुलाखतीत केला खुलासा

WWE मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा अंडरडेकर स्वत: घाबरायचा असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही बातमी खरी असून याबाबत एका युट्यूब चॅनेलवर खुद्द अंडरटेकर याने खुलासा केला आहे.

WWE रिंगमध्ये भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या Undertaker ला वाटायची भीती ! स्वत:च एका मुलाखतीत केला खुलासा
The Dead Man अशी ख्याती असलेल्या अंडरटेकर सुद्धा घाबरायचा, स्वत:च सांगितली 'ती' गोष्टImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 1:46 PM

मुंबई : द डेड मॅन अशी ख्याती असलेला डब्ल्यूडब्ल्यूई रिंगमधील अंडरडेकर सर्वांनाच माहिती आहे.उंच ढीपाड आणि कफिनमधून रिंगमध्ये एन्ट्री घेणारा अंडरटेकर पाहिला की त्याच्याकडे नजरा खिळून बसायच्या.त्याला पाहूनच अनेकांचा रिंगमध्ये थरकाप उडायचा. रेसलमानियामध्ये 21 वेळा सलग विजय मिळवणं सोपं काम नाही.पण ही कामगिरी आतापर्यंत अंडरटेकर करत आला आहे. इतकी मोठी कामगिरी करणारा अंडरडेकर स्वत: घाबरायचा असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही बातमी खरी असून याबाबत एका युट्यूब चॅनेलवर खुद्द अंडरटेकर याने खुलासा केला आहे. बॉक्सिंग दिग्गज माईक टायसनशी केलेल्या संवादात त्याने हा खुलासा केला आहे. अंडरटेकरला लहानपणी शेक या कुस्तीपटूची त्याला खूपच भीती वाटायची. द शेकनं 1940 ते 1990 दरम्यान रेसलिंग गाजवली. तसेच बिग टाईम रेसलिंग, एनडब्ल्यूए आणि डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये खेळला आहे.

“त्याला लहानपणी खूपच घाबरायचो. तेव्हा मी 10 किंवा 11 वर्षांचा असेल. मी तेव्हा टेक्सासमधील हॉस्टनमध्ये राहात होतो. माझ्या आईला रेसलिंगची तिकीटं मिळाली होती. शेक तिथे येणार होता. समोर कोण प्रतिस्पर्धी होता हे मला माहिती नाही. तेव्हा मी आणि माझा मित्र रस्त्याच्या पलीकडे वेड्यासारखं बोलत होतो. जेव्हा शेक रिंगमध्ये उतरला. त्याला पाहता क्षणीच उपस्थित प्रत्येक जण घाबरला. कधी कधी तो साप घेऊन यायचा, तर कधी आग फेकायचा.”, असं अंडरटेकरनं सांगितलं. त्याला प्रत्येकजण घाबरायेच, मोठ्या रेसलिंग कार्डवर नसूनही त्याची दहशत होती.

“त्याला अशा स्थितीत पाहिल्यानंतर आम्हाला मानसिक धक्काच बसला.भीतीने आम्ही आरडाओरड करू लागलो. तसेच तिथून पळ काढण्याचा देखील प्रयत्न केला.आम्हाला वाटलं आता शेक आम्हाला गिळून टाकेल. आम्ही गर्दीतून पळ काढण्यासाठी जीवाचा आटापीटा करत होतो.”, असंही डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर अंडरटेकर याने सांगितलं.

रेसलर शेक यांचं खरं नाव एडवर्ड फरहत असं आहे. मात्र रिंगमध्ये त्याला शेक या नावानं ओळखलं जातं होती. शेक त्याचा पुतण्या साबूने अशीच स्टाईल अवलंबली होती. शेक यांचा मृत्यू 18 जानेवारी 2003 रोजी झाला. तेव्हा ते 76 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. 2007 मध्ये त्यांचा समावेश डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.