न्यूयॉर्क: WWE सुपरस्टार ‘द अंडरटेकर’चा (The Undertaker) वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंटच्या (WWE) रिंगमधील तब्बल 30 वर्षांचा प्रवास संपला आहे. रविवारी सर्व्हायव्हर सीरीज पीपीव्हीमध्ये द अंडरटेकरचा निरोप समारंभ (farewell to Undertaker) पाहायला मिळाला. 19 नोव्हेंबर 1990 रोजी डेब्यू करणाऱ्या अंडरटेकरनं 22 नोव्हेंबर 2020 रोजी WWE चा निरोप घेतला. Undertaker आता पुन्हा कधीच WWE रिंगमध्ये फाईट करताना दिसणार नाही, त्यामुळे त्याच्या चाहते दुःखी झाले आहेत. (WWE superstar The Undertaker retire from world wrestling entertainment)
निरोप समारंभांवेळी अंडरटेकर म्हणाला की, “रिंगातील माझी वेळ आता संपली आहे, मला आता निरोप द्या”, यावेळी WWE मधील चॅम्पियन्स ट्रिपल एच, शॉन मायकल, बिग शो, रिक फ्लेयर आणि केनदेखील उपस्थित होते. गेल्या 30 वर्षांमध्ये Undertaker ने चाहत्यांना दिलेल्या आठवणींसाठी केन आणि शॉन मायकलने अंडरटेकरचे चाहत्यांच्या वतीने आभार मानले. यावेळी अंडरटेकरने भाषणानंतर त्याची ट्रेडमार्क पोझ दिली. स्क्रिनवर पॉल बियरचा फोटोही दाखवण्यात आला होता. निरोप समारंभावेळी अंडरटेकरही भावुक झाला होता.
अंडरटेकरचं खरं नाव मार्क कॅलवे आहे. टेक्सास युनिव्हर्सिटीमधून त्याने ‘स्पोर्टस मॅनेजमेंट’चं शिक्षण घेतलं. त्यानंतर 1990 मध्ये त्याने WWE शी करार केला. तेव्हापासून गेली 30 वर्ष तो WWE च्या रिंगमध्ये फाईट करतोय. भारतात त्याचे असंख्य चाहते आहेत. तब्बल तीन दशकं WWE च्या रिंगमध्ये राज्य करणारा Undertaker आता थकला आहे. तो आता 55 वर्षांचा आहे. त्यामुळे आता त्याला पूर्वीसारख्या फाईट्स करता येत नाहीत. त्यामुळेच त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.
WWE मधील 30 वर्षांच्या कारकीर्दीत अंडरटेकरने ७ वेळा जागतिक विजेतेपद पटकावलं आहे. तसेच 2007 मध्ये त्याने रॉयल रम्बल स्पर्धा जिंकली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने 21 Wrestlemania सामने जिंकले आहेत. 22 व्या सामन्यात ब्रॉक लेसनरने त्याचा विजयरथ रोखला होता.
— Undertaker (@undertaker) November 22, 2020
अंडरटेकरची तीन लग्न
WWE सोबत करार करण्यापूर्वी अंडरटेकरने jodi lynn हिच्याशी विवाह केला होता. 10 वर्षांनी ते दोघे विभक्त झाले. 2010 मध्ये त्याने Sara Frank शी लग्न केले. परंतु सात वर्षानंतंर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर वयाच्या 45 व्या वर्षी (2010 मध्ये) त्याने त्यानं माजी कुस्तीपटू मिचेल मॅककूल (Michelle McCool) हिच्याशी लग्न केलं. या दोघांना 2012 मध्ये एक मुलगा झाला. तो त्याच्या कुटुंबियांसह ऑस्टीन येथे राहतो. अंडरटेकर WWE च्या एका वर्षासाठी 19 कोटी रुपये पगार घेत होता, अशी चर्चा आहे.
संबंधित बातम्या
WWE प्रसिद्ध रेसलरचा रिंगमध्येच मृत्यू, प्रेक्षकांना वाटलं मॅचचाच भाग!
हार्दिक पंड्यासोबतचा फोटो वादात, WWE सुपरस्टार रणवीरवर कायदेशीर कारवाई करणार?
(WWE superstar The Undertaker retire from world wrestling entertainment)