ऑस्ट्रेलियात चहलचा कहर, अजित आगरकरच्या अभेद्य विक्रमाशी बरोबरी
मेलबर्न : फिरकीपटू यजुवेंद चहलच्या भेदक सहा विकेट्सच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि निर्णायक वन डे सामन्यात 230 धावांत गुंडाळलं. कुलदीप यादवच्या जागी स्थान मिळवलेल्या यजुवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अक्षरश: नाचवलं. उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅण्डस्कोम्ब, मार्कस स्टोइनिस, रिचर्डस्न आणि झाम्पा या सहा विकेट्स घेऊन कांगारुंची दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियाला 48.4 षटकात सर्वबाद 230 धावा […]
मेलबर्न : फिरकीपटू यजुवेंद चहलच्या भेदक सहा विकेट्सच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि निर्णायक वन डे सामन्यात 230 धावांत गुंडाळलं. कुलदीप यादवच्या जागी स्थान मिळवलेल्या यजुवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अक्षरश: नाचवलं. उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हॅण्डस्कोम्ब, मार्कस स्टोइनिस, रिचर्डस्न आणि झाम्पा या सहा विकेट्स घेऊन कांगारुंची दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियाला 48.4 षटकात सर्वबाद 230 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून पीटर हेण्डस्कोम्बच्या 58 धावा वगळता अन्य खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही.
अजित आगरकरच्या विक्रमाशी बरोबरी
भारताकडून चहलने 6 तर भुवनेश्वर आणि शमीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. यजुवेंद्र चहलने या सहा विकेट घेत अनेक विक्रम केले आहेत. ऑस्ट्रेलियात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर एका वन डे सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अजित आगरकरने 2004 साली केली होता. त्या सामन्यात आगरकरने 42 धावा देऊन सहा विकेट घेतल्या होत्या. चहलनेही 42 धावा देत ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क (6/43, 2015) आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी
अजित आगरकरचा हा विक्रम ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेतील आहे. पण ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धच सर्वात जास्त विकेट घेणारा चहल एकमेव भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने सध्या ड्रेसिंग रुममध्ये प्रशिक्षक म्हणून बसलेल्या रवी शास्त्री यांचा विक्रम मोडला. शास्त्रींनी 1991 मध्ये 15 धावा देऊन पाच कांगारुंना माघारी धाडलं होतं.
सर्वोत्कृष्ट लेग स्पिनरच्या यादीत स्थान
यजुवेंद्र चहल एवढाच विक्रम करुन थांबला नाही. त्याने आता दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. एका वन डे सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणारा तो सहावा भारतीय गोलंदाज ठरलाय.
एक लेग स्पिनर म्हणून चहलने दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. वन डे सामन्यात लेग स्पिनर म्हणून सर्वोत्कृष्ट कामगिरी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या (7/12) नावावर आहे. या यादीत रशिद खान (7/18), इम्रान ताहीर (7/45), अनिल कुंबळे (6/12), इम्रान ताहीर (6/24), यासिर शाह (6/26), शाहीद आफ्रिदी (6/24) आणि त्यानंतर चहलचा क्रमांक लागतो.