IND vs BAN: एकदिवसीय मालिका या चॅनेलवरती तुम्हाला पाहता येणार, टीम इंडियाचा कसून सराव
टीम इंडियाचा कसून सराव
मुंबई : उद्या पासून टीम इंडियाची (IND) बांगलादेशविरुद्ध (BAN) एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. उद्याच्या मॅचमध्ये टीम इंडियात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. टीम इंडियात भविष्यात मोठा बदल करण्यात येणार असल्यामुळे अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआय (BCCI) करीत आहे.
टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिका आणि कसोटी खेळणार आहे. सराव करीत असताना टीम इंडियाचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमी जखमी झाला आहे. त्याच्या हाताला मोठी जखम झाली असल्यामुळे एकदिवसीय मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली आहे.
इंडियामध्ये सोनी स्पोर्ट्स या वाहिनीवरती चाहत्यांना उद्या मॅच पाहता येणार आहे. इंडियातील चाहत्यांना सोनी लाइव्ह अॅपवर सुध्दा भारत-बांगलादेश सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. उद्या सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होईल.
एकदिवसीय सामन्यासाठी बांगलादेश टीम
लिटन दास (कर्णधार), अनामूल हक बिजॉय, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, यासिर अली, मेहिदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, हसन महमूद, इबादत हुसेन, नसुम अहमद, महमुदुल्लाह, नजमुल हुसेन, शान्तो, नजमुल हुसेन. नुरुल हसन सोहन.
एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन
कसोटीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जडेजा