Mantralay : मंत्रालयात ‘स्पायडरमॅन’ पद्धतीने तरुणाचे आंदोलन
मंत्रालयात 'स्पायडरमॅन' पद्धतीने तरुणाचे आंदोलन
मुंबई : मंत्रालयात (Mantralay) एका आंदोलन कार्यकर्त्यांने संरक्षण जाळीवर उडी घेतल्यामुळे सुरक्षा रक्षकांचा चांगलाचं गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे संरक्षण जाळीवर उडी घेतल्यानंतर सुद्धा तो कार्यकर्ता घोषणा देत असल्याचं व्हिडीओ (Video) स्पष्ट दिसत आहेत. मंत्रालयात विविध कामानिमित्त आलेले नागरिक सुद्धा कार्यकर्त्याचं आंदोलन पाहत असल्याचं दिसतंय. दुपारच्या सुमारास उडी घेतल्यामुळे आंदोलन कर्त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. आंदोलनकर्ता (Agitator) तरुण असून त्याच्या पाठीवर एक बॅग आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील हा तरुण आहे. त्यांच्या प्रेयसीवर अत्याचार होता, त्यासाठी त्या तरुणाने चारवेळा मंत्रालयात पत्र दिले होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुद्धा पत्र दिले होते. सद्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पत्र दिले होते. पण कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नसल्याने हतबल झालेल्या आंदोलनकर्त्याने उडी मारली. सुरक्षा जाळी असल्यामुळे बचावला, पण जाळीत अडकल्याने जखमी झाला आहे. पुढील उपचारासाठी त्याला जीटी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस अधिक्षक त्याचा तपास करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
आंदोलनकर्त्याने संतापून हे कृत्य केल्याचे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र शासनाने मंत्रालयात अशा पद्धतीची कोणतीही घटना होऊ नये, यासाठी जाळी लावली आहे.