Yuvraj Singh FIR | क्रिकेटपटू युवराज सिंहच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) याच्या विरोधात हरयाणामध्ये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Yuvraj Singh FIR | क्रिकेटपटू युवराज सिंहच्या अडचणीत वाढ, 'या' प्रकरणी गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 11:47 AM

चंदिगड : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) याच्या विरोधात हरयाणामध्ये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी (2020) एका इंस्टाग्राम लाईव्हदरम्यान युवराजने दलित समाजाबाबत एक आक्षेपार्ह कमेंट (टिप्पणी) केली होती. युवराजची ही कमेंट दलित समाजाचा अपमान करणारी असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणानंतर युवराजने माफीदेखील मागितली होती. दरम्यान, वकील आणि दलित ह्युमन राईट्सचे संयोजक रजत कलसन यांच्या तक्रारीनंतर हरयाणा पोलिसांनी युवीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Yuvraj Singh Accused Of Making ‘Casteist Slur’ Against Yuzvendra Chahal, Fresh FIR Filed Against Sixer king)

गेल्या वर्षी इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान टीम इंडियाचा शिलेदार युजवेंद्र चहलबाबत (Yuzvendra Chahal) बोलताना युवीने जातीवादी शब्द वापरले होते. यानंतर युवराजवर त्याच्या या टिप्पणीसाठी मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती. त्यानंतर विश्वचषक विजेत्या या खेळाडूने एक निवेदन जारी करत या प्रकरणी माफीदेखील मागितली होती. दरम्यान, युवराजच्या त्या जातीवादी वक्तव्यामुळे त्याच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम 153, 153 (अ), 505, 295 आणि एससी / एसटी कायद्यासंबंधित कलमांतर्गत युवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जवळपास 8 महिन्यांपूर्वी युवराज सिंह आणि टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा हे दोघे इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट करत होते. त्यावेळी यजुवेंद्र चहलबद्दल बोलताना युवराजने आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. दलितांच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते रजत कलसन यांनी युवीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याने 2019 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. युवराज हा 2007 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धा आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. देशाला दोन विश्वचषक जिंकवून देण्यात युवराजचा सिंहाचा वाटा आहे. विशेष म्हणजे 2011 च्या वर्ल्डकममध्ये युवराजला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले होते. 304 एकदिवसीय सामन्यांमध्ये 278 डावात त्याने 36.5 च्या सरासरीने 8701 धावा फटकवाल्या आहेत. यामध्ये 14 शतकं आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 161 डावांमध्ये गोलंदाजी करत त्याने 111 विकेट्स मिळवल्या आहेत.

हेही बातम्या :

India vs England 2021 | कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक, दोन्ही संघ, Full schedule

India vs England 2nd Test, 3rd Day Live | टीम इंडियाची चौथी विकेट, रिषभ पंत आऊट

(Yuvraj Singh Accused Of Making ‘Casteist Slur’ Against Yuzvendra Chahal, Fresh FIR Filed Against Sixer king)

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.