नव्या इनिंगसाठी युवराज सिंहने पुन्हा बीसीसीआयचे दार ठोठावलं!
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवराज सिंह आता नवी इनिंग सुरु करणार आहे. त्यासाठी त्याने बीसीसीआयचं दार ठोठावलं आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवराज सिंह आता नवी इनिंग सुरु करणार आहे. त्यासाठी त्याने बीसीसीआयचं दार ठोठावलं आहे. परदेशातील टी 20 लीगमध्ये खेळण्यासाठी युवराजने बीसीसीआयची परवानगी मागितली आहे. काही दिवसांपूर्वीच युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर आता आता युवराज परदेशी टी 20 लीगमध्ये खेळणार आहे.
बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “युवराजने बीसीसीआयला पत्र लिहिलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यामुळे, त्याला परवानगी देण्यास काही अडचण येईल असं वाटत नाही”
नाव – युवराज सिंह, वय 37 वर्ष, 6 चेंडूत 6 सिक्स, युवीची संपूर्ण कारकीर्द
गेल्या आठवड्यात निवृत्तीच्या घोषणेवेळी युवराजने आपण परदेशी टी 20 लीगमध्ये खेळणार असल्याचं म्हटलं होतं. “मी टी 20 क्रिकेट खेळू इच्छित आहे. मनोरंजन किंवा स्वत:च्या आनंदासाठी मी क्रिकेट खेळू शकतो. आता मला माझ्या आयुष्याचा आनंद लुटायचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलबाबत विचार करुन ताण येतो”
सक्रिय खेळाडूंना परवनागी नाही
बीसीसीआयच्या नियमानुसार सक्रीय खेळाडू म्हणजे ज्यांनी निवृत्ती घेतलेली नाही, ते परदेशी टी 20 लीगमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. यापूर्वी निवृत्ती जाहीर करुन वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान यासारख्या भारतीय खेळाडूंनी यूएईमध्ये टी 10 लीगमध्ये भाग घेतला होता.
गेल्या महिन्यात इरफान पठाणने कॅरेबियन क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेतला होता. इरफान सध्या फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये सक्रीय आहे, तरीही त्याने कॅरेबियन क्रिकेटमध्ये भाग घेतला होता.
संबंधित बातम्या
नाव – युवराज सिंह, वय 37 वर्ष, 6 चेंडूत 6 सिक्स, युवीची संपूर्ण कारकीर्द
कॅन्सरने डगमगला नाही, मात्र निवृत्ती जाहीर करताना युवराज सिंह ढसाढसा रडला!