Video : टायगर अभी जिंदा हैं… युवीचे एकाच ओव्हरमध्ये गगनचुंबी 4 षटकार, पाहा डोळ्यांचं पारणं फेडणारा व्हिडीओ

युवराज सिंगने एकाच ओव्हरमध्ये गगनचुंबी 4 षटकार लगावले. 18 व्या ओव्हरमध्ये 4 षटकार मारत त्याने त्याच्याच 6 षटकारांची आठवण पुन्हा क्रिकेट रसिकांना करुन दिली. | Yuvraj Singh

Video : टायगर अभी जिंदा हैं... युवीचे एकाच ओव्हरमध्ये गगनचुंबी 4 षटकार, पाहा डोळ्यांचं पारणं फेडणारा व्हिडीओ
Yuvraj Singh hit 4 Six in one over
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 10:26 AM

मुंबई : जागतिक क्रिकेटमधील षटकारांचा बादशहा युवराज सिंगने (Yuvraj Singh) पुन्हा एकदा आपला जलवा दाखवलाय. शनिवारी पार पडलेल्या वर्ल्ड सेफ्टी सिरीजच्या (World Safety Series) इंडिया लिजेंड्स (India legends) विरुद्ध साऊथ आफ्रिका लिजेंड्स (South Africa Legends) यांच्यातील सामन्यात युवराज सिंगने एकाच ओव्हरमध्ये गगनचुंबी 4 षटकार लगावले. 18 व्या ओव्हरमध्ये 4 षटकार मारत त्याने त्याच्याच 6 षटकारांची आठवण पुन्हा क्रिकेट रसिकांना करुन दिली.  (Yuvraj Singh hit Four six in one over Road Safety World Series)

टायगर अभी जिंदा हैं…

युवराज सिंगने 22 चेंडूत 52 धावांची खेळी केली. त्याने या खेळीला 6 षटकार आणि 2 चौकारांचा साज चढवला. नाबाद 52 धावा करताना ‘टायगर अभी जिंदा हैं…’ हेच त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं.

इंडिया लिजेंड्सने प्रथम बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 204 धावांचा डोंगर उभा केला. याच्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या 60, युवराजच्या नाबाद 52 तर एस. बद्रीनाथच्या 42 धावांचा समावेश आहे. युसूफ पठाणने 23 आणि मनप्रीत गोनीने 16 धावांचं योगदान दिलं.

युवराजचे एकाच ओव्हरमधील 4 षटकार

इंडिया लिजेंड्सचं 205 धावांचं लक्ष्य

नाणेफेक गमावल्यानंतरही इंडिया लिजेंड्सला प्रथम बॅटिंग करण्याची संधी मिळाली. याच संधीचं सोनं करत सचिनने आतिषी खेळी केली. त्याने घातलेल्या पायावर युवराज सिंहने कळस चढवला.

सचिनची वेगवान 60 धावांची खेळी

सचिन तेंडुलकरने 37 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारांच्या सहाय्याने 60 रन्सची धमाकेदार खेळी केली. त्याचे अफलातून चौकार बघण्यासारखे होते. अगदी त्याने मारलेले फ्लिक, कव्हर ड्राईव्ह ‘सुप्पर से उप्पर’ होते. दुसऱ्या विकेटसाठी सचिन आणि एस. बद्रीनाथने 95 रन्सची पार्टनरशीप केली. दक्षिण आफ्रिकेच्या जोंडेकीने सचिनला आपलं शिकार बनवलं. तर 14 व्या ओव्हरमध्ये बद्रीनाथ 42 रन्सची खेळी करुन रिटायर्ड हर्ट झाला.

सचिनने पाया घातला, युवराजने चढवला कळस

सिक्सर किंग युवराजने देखील आपल्या आक्रमक अंदाजात बॅटिंग केली. युवराजने तर केवळ 21 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने एकाच ओव्हरमध्ये त्याने चार षटकार खेचले. युवराजने 21 चेंडूत 2ृ52 धावा ठोकल्या. मनप्रीत गोनी आणि युवराज सिंगमध्ये 63 रन्सची पार्टनरशीप झाली.

युवराजचे टी ट्वेन्टीत सलग 6 सिक्सर

भारतीय क्रिकेट जगतात युवराज सिंगला षटकारांचा बादशहा म्हणून ओळखलं जातं. टी 20 वर्ल्डकप 2007 मध्ये इंग्लंडचा जगदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये युवराजने 6 षटकार खेचले होते. दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिज्ब्सच्या विक्रमाशी युवराजने बरोबर साधली होती.

(Yuvraj Singh hit Four six in one over Road Safety World Series)

हे ही वाचा :

देव कधी रिटायर होत नाही, सचिनचा धमाका, 30 चेंडूत तुफानी अर्धशतक!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.