पोलार्डचे खणखणीत 6 षटकार, ‘सिक्सर किंग’ युवराजची प्रतिक्रिया, म्हणाला…..
युवराज सिंहने (yuvraj singh) ट्विट करत कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) 6 सिक्सबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : वेस्टइंडिज विरुद्ध श्रीलंका (west indies vs sri lanka 1st t 20) यांच्यात बुधवारी 3 मार्चला पहिला टी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात विंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने एका ओव्हरमधील 6 चेंडूत 6 सिक्स मारण्याची (Kieron Pollard 6 Sixes) कामगिरी केली. यासह त्याने टीम इंडियाच्या युवराज सिंहच्या (Yuvraj Singh) रेकॉर्डची बरोबरी केली. युवराजने वर्ल्ड टी 20 वर्ल्ड 2007 मध्ये इंग्लंड विरुद्ध हा पराक्रम केला होता. दरम्यान युवराजने पोलार्डच्या खणखणीत 6 सिक्सबाबत ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. (yuvraj singh reaction on kieron pollard 6 sixes)
युवराज काय म्हणाला ?
“पोलार्ड तुझे एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत स्वागत आहे. हे 6 सिक्सर तुला शोभा देतात”, असं आशयाचं ट्विट युवराजने केलं.
Welcome to the club @KieronPollard55 #sixsixes you beauty !!!⭐️ ? ⭐️?⭐️?
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) March 4, 2021
पोलार्डने मारलेले 6 षटकार
श्रीलंकेचा अकिला धनंजया सामन्यातील 6 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमध्ये पोलार्डने आपलं रौद्र रुप धारण केलं. पोलार्डने एकामागोमाग एक असे उत्तुंग षटकार खेचयला सुरुवात केली. क्रिकेट चाहत्यांना आपण रिप्ले पाहतोय की काय, असंच वाटू लागले होते. पोलार्डने हे 6 सिक्स मैदानातील वेगवेगळ्या दिशेला मारले. यासह पोलार्डने युवराजच्या 6 सिक्स मारण्याच्या विक्रमाची 14 वर्षानंतर बरोबरी केली.
Three ??ghty occasions on which a player has hit six sixes in international cricket ?
Polly becomes the latest to join the list ???
6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣ ? ?? | 2021#OneFamily #MumbaiIndians #WIvSL @KieronPollard55 @windiescricketpic.twitter.com/KG9EBBOPHK
— Mumbai Indians (@mipaltan) March 4, 2021
युवराजचे 6 सिक्स
2007 मध्ये पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते. या वर्ल्ड कपमध्ये 19 सप्टेंबर ला टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना खेळण्यात आला. टीम इंडियाने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. काही विकेट्स पडल्यानंतर युवराज मैदानात आला. बॅटिंगदरम्यान मैदानात इंग्लंडच्या अँड्रयू फ्ंलिटॉफने युवराजला डिवचलं. युवराजने याचा राग बॅटने काढला. स्टु्अर्ट ब्रॉड सामन्यातील 19 वी ओव्हर टाकायला आला.
युवराजने फ्लिंटॉफचा सर्व राग ब्रॉडवर काढला. युवराजने एकामागोमाग एक गगनचुंबी सिक्स खेचले. विशेष म्हणजे युवराजने 6 वा सिक्स खेचत अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक झळकावलं.
6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣ ? ??????? | 2007#OneFamily #MumbaiIndianspic.twitter.com/jSTufcs1HL
— Mumbai Indians (@mipaltan) March 4, 2021
संबंधित बातम्या :
Video | कायरन पोलार्डचा तडाखा, 6 चेंडूत 6 सिक्स, युवराजच्या विक्रमाशी बरोबरी
India vs England 4th Test, Day 1 Highlights | पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व, दिवसखेर 1 बाद 24 धावा
(yuvraj singh reaction on kieron pollard 6 sixes)